मलचिंग पॉलीथिनद्वारे साकारलीय टरबुजाची शेती
By Admin | Updated: January 12, 2015 22:57 IST2015-01-12T22:57:52+5:302015-01-12T22:57:52+5:30
टरबुजाची शेती या भागात अनेक शेतकरी करतात़ यात काहींना लाभ होतो तर काहींना नुकसान सोसावे लागते़ एकुर्ली येथील संतोष देवतळे या शेतकऱ्याने टरबुजाची शेती करताना मलचिंग पॉलिथीन पद्धतीचा

मलचिंग पॉलीथिनद्वारे साकारलीय टरबुजाची शेती
किशोर तेलंग - तळेगाव (टा़)
टरबुजाची शेती या भागात अनेक शेतकरी करतात़ यात काहींना लाभ होतो तर काहींना नुकसान सोसावे लागते़ एकुर्ली येथील संतोष देवतळे या शेतकऱ्याने टरबुजाची शेती करताना मलचिंग पॉलिथीन पद्धतीचा वापर केला. यात त्यांना फायदा होत असून ७० हजारांच्या खर्चात १ लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत़ ही पद्धत अन्य शेतकऱ्यांनाही अंगिकारता येऊ शकते़
तळेगाव ते अल्लीपूर मार्गावर देवतळे यांची ८ एकर शेती आहे. गत ४ वर्षांपासून ते टरबुजाची शेती करीत आहेत. पूर्वी त्यांना उत्पन्न कमी होत होते़ यामुळे कृषी विभागाचा सल्ला घेत त्यांनी गतवर्षापासून मलचिंग पन्नीचा वापर सुरू केला़ यातून त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे़ टरबुजाच्या शेतीमध्ये मलचिंग पन्नीचा वापर आणि अन्य खर्च, असा एकूण ७० हजार रुपयांचा खर्च येतो, असे देवतळे सांगतात़ या आधुनिक शेतीमध्ये ते सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न नियमित घेत आहेत़