बसस्थानकातील व्यावसायिकांकडून पर्यायी जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:42 IST2018-03-15T23:42:05+5:302018-03-15T23:42:05+5:30
येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे.

बसस्थानकातील व्यावसायिकांकडून पर्यायी जागेची मागणी
ऑनलाईन लोकमत
वर्धा : येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे. या आदेशानुासर कार्यवाही सुरू आहे. याच काळात येथील व्यापसायीकांनी पर्यायी जागा देण्याची मागणी पालकमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.
बसस्थानक परिसरात गत ४० वर्षांपासून प्रवाशांना आवश्यक वस्तु पुरविण्ययाचे काम या छोट्या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आता वयाच्या अखेरच्या काळात कुठे जावे असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. सर्व दुकानदार राज्य परिवहन मंडळाकडे नियमित परवाना शुल्क भरतात. यामुळे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या व्यावसायिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. पंकज भोयर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर प्रश्नाला मुंबई गेल्यावर परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न तातडीने सोडवू असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
निवेदन देतेवेळी दिनेश साहू, उमेश अग्निहोत्री, रविंद्र चंदोरीया, राजेंद्र गेलानी, बाजीराव लिमन, राजू चंदोरिया बसस्थानक परिसरातील व्यावसायिक उपस्थित होते.