शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कंत्राटदाराची बनवाबनवी माजी नगराध्यक्षाने केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:02 IST

शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता.

ठळक मुद्देनगरपंचायतमध्ये खळबळ : घंटागाडीत दगड टाकून वाढविले कचऱ्याचे वजन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता. हा प्रकार माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक डॉ. राजेश जयस्वाल यांनी उघडकीस आणल्याने नगरपंचायतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.मागील पंधरा दिवसापूर्वी स्वच्छतेच्यादृष्टीने घरोघरी जावून ओला व सुका कचरा तसेच प्लास्टीक उचलून ते निर्धारीत ठिकाणी नेवून टाकण्यात येत आहे. याचा कंत्राट नागपुरातील साजन पारस्कर यांच्या व्ही.आर.ए.एंटरप्रायजेसला एक हजार रुपये प्रतीटन प्रमाणे दिला. त्यानुसार कचºयाची वाहतूक सुरु असताना वाहनाच्या वजनाबाबत नगरसेवक डॉ.राजेश जयस्वाल यांना शंका आल्याने त्यांनी नगरपंचायतीच्या संबधित महिला अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पण, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने जयस्वाल यांनी वाहनांवर पाळत ठेऊन वजन करण्यासाठी ती वाहने बाजार समितीच्या काट्यावर पोहचताच डॉ.जयस्वाल हे उपाध्यक्ष अनिल काटोले, नगरसेवक मंगेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भजभुजे यांना सोबत घेऊन तेथे आले.वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात कचऱ्याखाली ९० किलो वजनाचे ४ मोठे दगड आढळून आले. याबाबत नगरसवेक जयस्वाल यांनी नगरपंचायतीला कळविल्यानंतर कर निरिक्षक दिनेश दुधे, प्रशांत रहांगडाले यांनी येवून पंचनामा करीत दगड ताब्यात घेतले. लगेच माजी नगराध्यक्ष चुडामन हांडे, गटनेते शैलेंद्र दप्तरी व नगराध्यक्ष शारदा माहुरे यांनी घटनास्थळ गाठले. आता नगरपंचायत या कंत्राटदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्व सेलू वासीयांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदाराने कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी आपल्या कामावरील मजुरांना दगडाचा वापर करायला लावला. वाहनाच्या वजनाबाबत शंका होती. त्यामुळे पाळत ठेऊन कंत्राटदाराचा भ्रष्ट कारभार पकडला.त्या कंत्राटदाराचा कचरा उचलण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी मी लावून धरणार आहे.- डॉ.राजेश जयस्वाल, नगरसेवक नगरपंचायत सेलू.मला हा प्रकार कळल्यावर मी घटनास्थळी पोहचली. कंत्राटदाराला बोलावून मुख्याधिकाºयासमक्ष चर्चा करुन यातील दोषीवर नक्कीच कारवाई केल्या जाईल.- शारदा माहुरे, नगराध्यक्ष नगरपंचायत सेलू.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाnagaradhyakshaनगराध्यक्ष