शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रभावी नियोजन करूनच पळविला ट्रकमधील सुखामेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 5:00 AM

ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी संगणमत करून तब्बल ४० लाखांच्या सुख्यामेव्याचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. ट्रक चालक जमीर अहेमद जमील अहेमद रा. नागपूर हा क्लिनर मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी याला सोबत घेवून सुखामेवा भरलेला ट्रक घेवून जात होता. ट्रक सारवाडी शिवारात आला असता ट्रकचालकाने ट्रक पलटी झाल्याचा तसेच ग्रामस्थांनी सुखामेवा पळून नेल्याचा आव आणत तशी माहिती ट्रक मालकाला दिली.

ठळक मुद्दे पोलीस तपासात उघड : राष्ट्रीय मार्गावरील ट्रक पलटी प्रकरण, चोरीचा मुद्देमाल केला जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सुखामेवा घेवून जाणारा ट्रक उलटला होता. हे प्रकरण साफ बनावटी असल्याचे तसेच ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी प्रभावी नियोजन करूनच ट्रकमधील सुखामेव्याची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी संगणमत करून तब्बल ४० लाखांच्या सुख्यामेव्याचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. ट्रक चालक जमीर अहेमद जमील अहेमद रा. नागपूर हा क्लिनर मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी याला सोबत घेवून सुखामेवा भरलेला ट्रक घेवून जात होता. ट्रक सारवाडी शिवारात आला असता ट्रकचालकाने ट्रक पलटी झाल्याचा तसेच ग्रामस्थांनी सुखामेवा पळून नेल्याचा आव आणत तशी माहिती ट्रक मालकाला दिली. या प्रकरणी संशय आल्याने ट्रक मालकाने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली. प्रभारी ठाणेदार चांदे, हुसेन शहा, गजानन बावणे, अमोल मानमोडे, मनोज आसोले, राहुल अमुने यांनी तपासाला गती देत चोरीचा मुद्देमाल जप्त केला.  अधिक चौकशीदरम्यान ट्रक चालकाने गवळीपुरा कामठी येथील नासिर जमाल अन्सारी व. वसिम अकरम अन्सारी यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे आरोपी यांनी संगणमत करून सदर ट्रकची मुळ नंबर प्लेट बदलवून दुसरी नंबर प्लेट क्र. एम. एच. ४० बी. जी. १५९९ ही बसवून ट्रकमधील किंमती बादामचे ३० किलो वजनाचे १०० पोटे व पिस्ता फ्रुटचा एक खोका व इतर माल इत्यादी किंमती मालाचा अपहार करून ट्रक पलटी करून ट्रकचे व किंमती मुद्देंमालाचे नुकसान केल्याचे पुढे आले आहे.

गुन्ह्याचा कट रचणारे फरारसदर गुन्ह्याचा कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक चमू नागपूर येथे रवाना करण्यात आली होती. पण या प्रकरणातील नागपूर येथील दोन्ही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही. 

फरार आरोपीस अटक करण्यासाठी घेताय माहीतीया प्रकरणी पोलिसांनी जमिर अहेमद जमिल अहेमद, तपसीर अहेमद जमिल अहेमद, मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी, वसीम अकरम ताजमोहम्मद अन्सारी,  मुंजमील उर्फ फाजील अहेमद फैयाज अहेमद, शेखर समीर उर्फ अत्तु अब्दुल रज्जाक यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडी मिळविली आहे. तर नासिर जमाल अन्सारी हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.उपराजधानीतून लागली नांदेड कनेक्शनची लिंकनागपूर येथे आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपी गवसले नसले तरी त्यांना याच गुन्ह्यासंदर्भातील नांदेड लिंकची माहिती मिळाली. त्यानंतर नांदेड येथे पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. तेथे शेर समीर उर्फ अत्तु अब्दुल रज्जाक याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. त्यावेळी चोरीचा माल त्याने खरेदी केल्याचे पुढे आले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस