शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:45 IST

अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जलाशयेही रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ९२०.७१ च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. यंदा १६ आॅगस्टपर्यंत केवळ ४५.२५ टक्केच पाऊस झालेला आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत पर्जन्यमान व्यवस्थित न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची शक्यता आहे.वर्धा तालुक्यात सरासरी ८८९.४० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंत केवळ २४२.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावीत वर्धा तालुक्यात ४७५.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट पर्यंत तालुक्यात २३८.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १६ आॅगस्ट पर्यंत तालुक्यात ५७९.४७ मि.मी. पाऊस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. देवळी तालुक्यात सरासरी ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. येथेही आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९३.२४ पाऊस झाला आहे. सेलू व देवळी तालुक्यात सरासरी ३९.६१ व ४८.६० टक्केच पाऊस पडला आहे. हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. १६ आॅगस्टपर्यंत हिंगणघाट तालुक्यात ६१४.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात ३६.९८ टक्के पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात चार महिन्यात १००१.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट महिन्याच्या मध्यार्धापर्यंत ५०८.९७ पावसाची नोंद झाली. या तालुक्यात ४९.१९ टक्के पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यात ८५०.३० मि.मी. पडतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९१.५३ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात केवळ ४२.१९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. आष्टी तालुक्यात चार महिन्यात ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ४२०.९९ मि.मी. पाऊस झाला. येथे ५१.३२ टक्के पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यात चार महिन्या ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्टपर्यंत ४४८.५४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. येथे ४८.१३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ९२०.७१ मि.मी.च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ५०४.०८ च्या सरासरीने ४०३२. ६७ मि.मी. झाला. जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई