दोन हजार जागांसाठी केवळ ४० अर्जांची विक्री
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:06+5:302014-06-14T01:19:06+5:30
काही वर्षांपूर्वी शिक्षक होण्याकरिता घ्याव्या लागत असलेल्या प्रशिक्षणासाठी रांगा लागत होत्या;

दोन हजार जागांसाठी केवळ ४० अर्जांची विक्री
वर्धा : काही वर्षांपूर्वी शिक्षक होण्याकरिता घ्याव्या लागत असलेल्या प्रशिक्षणासाठी रांगा लागत होत्या; पण या रांगा आता हद्दपार झाल्या आहे़ आता कॉलेज चालविण्यासाठी
डीटीएड कॉलेजच्या प्राध्यापकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे़ जिल्ह्यात डीटीएड्साठी दोन हजार जागा असताना अर्ज विक्रीचे तीन दिवस शिल्लक असताना
केवळ ४० अर्ज विकले गेलेत़ यामुळे डीटीएड कॉलेजेसचे भविष्य टांगणीला लागल्याचे दिसते़
प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक पदावर रूजू होण्याकरिता पदवी म्हणून डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो़ पूर्वी या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठी रांगा लागत होत्या़
टक्केवारी कमी असल्यास कित्येकांना प्रवेश मिळत नव्हते़ आता मात्र या अभ्यासक्रमातील प्रवेशाचे चित्रच बदलले आहे. डीटीएड्च्या प्रवेश प्रकियेकडे विद्यार्थी फिरकत
नसल्याचे दिसते़ २ जूनपासून प्रवेश अर्जाची विक्री सुरू झाली असून ती १६ जूनपर्यंत चालणार आहे़ या कालावधीत जिल्ह्यात केवळ ४० अर्जांची विक्री झाली़ अर्ज
विक्रीची तारीख संपण्यास तीनच दिवस आहेत. आता या तीन दिवसांत किती अर्जांची विक्री होईल, हे कळणार आहे़ अर्जांची विक्री घटल्यास प्रवेशावरही निश्चितच
परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर्षी डीटीएड् कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्राध्यापकांना भटकंती करावी लागतेय़(कार्यालय प्रतिनिधी)