१३ लाख नागरिकांसाठी केवळ १२ तज्ज्ञ डॉक्टर

By Admin | Updated: June 26, 2014 23:26 IST2014-06-26T23:26:24+5:302014-06-26T23:26:24+5:30

जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि पाच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून १३ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

Only 12 specialist doctors for 13 lakh citizens | १३ लाख नागरिकांसाठी केवळ १२ तज्ज्ञ डॉक्टर

१३ लाख नागरिकांसाठी केवळ १२ तज्ज्ञ डॉक्टर

वर्धा : जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि पाच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून १३ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. या लोकसंख्येचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी केवळ १२ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांभाळावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले. यामुळे रुग्णालये असून देखील आरोग्य सेवा मात्र जेमतेच असल्याची बाबही लपून राहिली नाही.
जिल्हा मुख्यालयी असलेल्या सामान्य रुग्णालयात वर्गची १९ पदे मंजूर आहे. पैकी सात जागा भरलेल्या असून निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल १२ पदे रिक्त आहे. आर्वी उपजिल्हा रुग्णालयासह वडनेर, पुलगाव आणि समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय एकाही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर नाही. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय असूनही येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर नाही.
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचीच वाणवा असल्याचे दिसून आले. वर्गची एकूण २७ पदे मंजूर आहे. पैकी १२ भरली असून १५ रिक्त आहेत. वर्ग २ ची ७१ पैकी पाच पदे रिक्त आहे. वर्ग ३ ची ३९८ पदे मंजूर असून ६५ पदे रिक्त आहे. वर्ग ४ ची २२८ पैकी ४० पदे रिक्त असल्याचे वास्तव आहे. वर्ग १ आणि वर्ग ३ व ४ च्या पदांमुळे खऱ्या अर्थाने रुग्णालयाची यंत्रणा परिपूर्ण होते. मात्र नेमकी हीच पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा आणि स्वच्छतेचा बोजवारा झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेची वाणवा आहे. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात आतील भागात नियमित स्वच्छता होत असल्याचे बघायला मिळाले. मात्र परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. याकडे आरोग्य प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब काहींनी ‘लोकमत’जवळ सांगितली.

Web Title: Only 12 specialist doctors for 13 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.