राकाँ गटाचा एकतर्फी विजय

By Admin | Updated: October 10, 2016 01:37 IST2016-10-10T01:37:19+5:302016-10-10T01:37:19+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत

One-way victory of Rakha group | राकाँ गटाचा एकतर्फी विजय

राकाँ गटाचा एकतर्फी विजय

हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत विद्यमान सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या संयुक्त गटाने १८ पैकी १८ जागांवर प्रचंड मताधिक्याने एकतर्फा विजय मिळविला. गत १५ वर्षांपासून या बाजार समितीवरील आपले वर्चस्व त्यांनी याही निवडणुकीत कायम ठेवून जिल्ह्यातील सहकार गटात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, माजी मातदार सुरेश देशमुख, काँगे्रसचे आ. रणजीत कांबळे, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे व शेतकरी संघटनेच्या सत्तारूढ गटाने १८ पैकी १८ जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळविला. त्यांच्या विरोधात भाजपचे आ. समीर कुणावार तसेच शिवसेनेने दोन वेगवेगळ्या गटात उमेदवार उभे करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; पण अ‍ॅड. कोठारी यांच्या गटाने एकतर्फा विजय मिळवून ते आव्हान मोडीत काढले.
सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत सभागृहात उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी स्मीता पाटील, तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार लोमा खोडे, पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली.(तालुका प्रतिनिधी)

गत १५ वर्षांपासून विद्यमान संचालक मंडळाने शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून लोकाभिमुख विविध योजना राबविल्या. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. त्याचीच पावती म्हणजे हा एकतर्फा विजय आहे. मिळालेले यश अपेक्षेपेक्षा अधिक असून विजयाचे शिल्पकार शेतकरी आहेत.
- अ‍ॅड. सुधीर कोठारी, राकाँ गटाचे विजयी उमेदवार, बाजार समिती, हिंगणघाट.

Web Title: One-way victory of Rakha group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.