शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

‘एक गाव-एक दिवस’ उपक्रमास आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 5:00 AM

सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. सोबतच वीजविषयक अन्य तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील गावात येत्या काळात ही मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणची जिल्ह्यात त्रिसूत्री मोहीम : १३ ठिकाणी होणार उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमास जिल्ह्यात ३१ जुलैपासून सुरुवात होणार असल्याची माहिती वर्धा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी १३ ठिकाणी याची सुरुवात होणार आहे.हा उपक्रम नागपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.उपक्रमांतर्गत महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्यात अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. सोबतच वीजविषयक अन्य तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील गावात येत्या काळात ही मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांनी यात सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी केले आहे.मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, संजय वाकडे, हेमंत पावडे, दिलीप मोहोड प्रयत्नरत आहेत. या मोहिमेच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.महावितरणचे अधिकारी साधणार संवादग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींगसंदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी ‘एक गाव - एक दिवस’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत महावितरणचे अधिकारी आणि जनमित्र गावात भेट देऊन माहिती घेतील. या मोहिमेत ग्रामस्थांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा, मोबाईल अ‍ॅप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करतील.येथे उपक्रमाची सुरुवातवर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंतोरा, आर्वी तालुक्यातील नांदपूर, काचनूर, देवळी तालुक्यातील विजयगोपाल, कारंजा तालुक्यातील गवंडी, हिंगणघाट तालुक्यातील कुटकी, समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव, वर्धा तालुक्यातील पिपरी (मेघे), स्टेशन फैल खरांगणा (गोडे) येथे उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण