पर्यावरण रक्षणार्थ दीड हजार झाडे लावणार

By Admin | Updated: May 22, 2016 01:54 IST2016-05-22T01:54:43+5:302016-05-22T01:54:43+5:30

पावसाळ्यात शहरात दीड हजार झाडे लावून पर्यावणाचा समतोल साधणार आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून ट्रिगार्ड घेत झाडांची जोपासना केली जाईल.

One thousand plants will be used for environmental protection | पर्यावरण रक्षणार्थ दीड हजार झाडे लावणार

पर्यावरण रक्षणार्थ दीड हजार झाडे लावणार

रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’ रॅली
देवळी : पावसाळ्यात शहरात दीड हजार झाडे लावून पर्यावणाचा समतोल साधणार आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून ट्रिगार्ड घेत झाडांची जोपासना केली जाईल. एक गाव झाले म्हणजे देश प्रदूषणमुक्त होत नाही, याची कल्पना आहे; पण सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
‘नो व्हेईकल डे’निमित्त अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलत होते. अतिथी म्हणून प्राचार्य सध्या कापसे, न.प. सभापती दिलीप कारोटकर, डॉ. मनोहर डगवार, सेवा सहकारीचे अध्यक्ष शरद आदमने उपस्थित होते. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचा उपक्रम म्हणून खा. तडस यांच्या मार्गदर्शनात प्रथम सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जनता हायस्कूलच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व खेळाळूंचा सत्कार करण्यात आला. यात वेदांत ठाकरे, मोहित पावसेकर, यश साखरकर, सुरेंद्र उमाटे, सुनील कुशवाह, मनीष सुरकार, आकाश अऱ्हाडे, प्रज्वल खडसंगे, साहिल टिपले, मान्सून मंगरूळकर, शुभम सयामचा समावेश आहे. प्रास्ताविक हरिदास ढोक, संचालन प्रा. पंकज चोरे यांनी केले तर आभार श्रीराम कामडी यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: One thousand plants will be used for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.