शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास

By admin | Updated: June 5, 2015 02:12 IST

धनादेश अनादर प्रकरणात सेलू निवासी आरोपी कृष्णा मारोतराव चाफले यास एक महिन्याचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वर्धा : धनादेश अनादर प्रकरणात सेलू निवासी आरोपी कृष्णा मारोतराव चाफले यास एक महिन्याचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा तिसरे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी ए.टी. काळे यांनी दिला.हिंगणघाट येथील पवनकुमार भट्टड यांचे कृषी केंद्र आहे. कृष्णा चाफले याचेही सेलू येथे कृषी केंद्र आहे. तो नेहमी भट्टड यांच्या दुकानातून साहित्य उधारीत खरेदी करीत होता. उधारी चुकती करण्याच्या उद्देशाने चाफले याने ०६ जानेवारी २०१४ रोजी २७ हजार ७३६ रुपयांचा आयडीबीआय बँकेचा धनादेश दिला. सोबतच बँकेत सदर धनादेशाबाबत ‘स्टॉप पेमेंट’ चा अर्ज केला. परिणामी, भट्टड यांनी सदर धनादेश खात्यात जमा केला असता बँकेने तो धनादेश न वटविता परत केला. यानंतर भट्टड यांनी अ‍ॅड. इब्राहीम बख्श आजाद यांच्या माध्यमाने कृष्णा चाफले यास नोटीस पाठवून थकित रकमेची मागणी केली; पण ती रक्कम दिली नाही. यामुळे भट्टड यांनी वर्धा न्यायालयात प्रकरण दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायाधीश ए.टी. काळे यांनी आरोपी कृष्णा चाफले यास धनादेश अनादर प्रकरणात दोषी ठरवून एक महिन्याचा कारावास व ५० हजार दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुणावली. पवन भट्टड यांच्यावतीने अ‍ॅड. इब्राहीम बख्श आजाद यांनी युक्तिवाद केला.(कार्यालय प्रतिनिधी)