ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: June 17, 2016 02:32 IST2016-06-17T02:32:32+5:302016-06-17T02:32:32+5:30

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले.

One killed, two injured in two trucks by two trucks | ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले एक ठार, दोन जखमी

ट्रकने दुचाकीस्वारांना उडविले एक ठार, दोन जखमी

इंझाळा येथील घटना : मृत व जखमींमध्ये तळणी येथील युवकांचा समावेश
इंझाळा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात घडली.
गजानन केराम (२५) असे मृतकाचे नाव आहे. दिनेश मेश्राम (३५) व विजय भिसे (४०) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतक व जखमी हे रा. तळणी(भागवत) येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, इंझाळा येथून एमएच ३५ के ४१५१ क्रमांकाचा ट्रक भरधाव जात होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने तळणी येथून दुचाकीने तिघेजण येत होते. इंझाळा बसस्थानकाजवळ ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये एकजण ठार, तर दोघे जण जखमी झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केले. यानंतर घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली. वृत्तलिहेस्तोवर पोलीस घटनास्थळी पोहचलेली नव्हते.
सदर ट्रक हा टॉवरच्या कामावर असून इंझाळा लगतच त्यांचे बस्ताण आहे. दररोज सायंकाळी चालक ट्रक घेऊन इंझाळा येथे मद्यप्राशन करण्यासाठी येत होता. जाताना ट्रक भरधाव नेत होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच आज हा अपघात झाल्याचेही बोलले जात आहे.(वार्ताहर)

Web Title: One killed, two injured in two trucks by two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.