दोन अपघातात एक ठार; एक गंभीर
By Admin | Updated: June 24, 2014 00:01 IST2014-06-24T00:01:30+5:302014-06-24T00:01:30+5:30
जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. कारंजा (घाडगे) तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर

दोन अपघातात एक ठार; एक गंभीर
कारंजा (घाडगे) व कामठी (खैरी) येथील घटना
कारंजा (घा.), वर्धा : जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. कारंजा (घाडगे) तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर कामठी (खैरी) येथील अपघातात चिमुकली जखमी झाली.
कारंजा येथील राष्ट्रीय महामार्गावरील चंदेवानी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. हा अपघात सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास झाला. यात उकंड महादेव डोंगरे (५०) रा. येनगाव यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस सुत्रांनुसार, येनगाव ग्रा.पं.चे शिपाई उकंड डोंगरे हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३१ जे १६४२ ने चिखलीकडे जात असताना वाहन क्र. एमएच ३७ जी-४६७१ ने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिनेश घारपुरे यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी भादंवीच्या कलम २७९, ३०४ अ, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.
कामठी (खैरी) येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या बालिकेला भरधाव दुचाकीने धडक दिली. यात मयूरी पुरके ही सात वर्षीय बालिका जखमी झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी ७ वाजाताच्या सुमारास झाला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच विक्की देशमुख याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर/स्थानिक प्रतिनिधी)