चार अपघातांत एक ठार; सात जखमी
By Admin | Updated: May 13, 2014 00:01 IST2014-05-13T00:01:58+5:302014-05-13T00:01:58+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात एक जागीच ठार झाल तर सात जण जखमी झाले. यातील तीन अपघात सोमवारी झाले तर एक अपघात रविवारी सायंकाळी घडला.

चार अपघातांत एक ठार; सात जखमी
वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात एक जागीच ठार झाल तर सात जण जखमी झाले. यातील तीन अपघात सोमवारी झाले तर एक अपघात रविवारी सायंकाळी घडला. सेलू येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. तर याच मार्गावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास भरधाव टिप्प्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे गंभीर गंभीर जखमी झाले. वर्धेत कारने दुचाकीला तर सेलसूरा येथे उभ्या ट्रॅक्टरचे चाक दुरूस्त करताना चालकाला दुचाकीले दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले. केळझर येथे ट्रेलरने विरूद्ध दिशेने येणार्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दोघात मामी आणि भाच्याचे नाते असल्याचे समोर आले. जखमींना सेवाग्राम रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले. हा अपघात सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सामाजिक वनीकरणच्या कार्यालयाजवळ घडला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला ट्रेलरने जवळपास ५00 फुट फरफटत नेले. यामुळे दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. जखमींची नावे राजेश उमेशसिंग सागवान (३५) व शशिकला दिलीप बाराहाते (४५) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाबळा येथील राजेश उमेशसिंग सागवान व त्याची मामी शशिकला दिलीप बाराहाते यांचा गावोगावी जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे हे दोघे दुचाकी क्र. एम.एच. ३२, ३३२८ ने विक्रीच्या कपड्याचा गठ्ठा घेवून नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान विरूद्ध दिशेने लोखंडी पोल घेवून येत असलेल्या ट्रेलर क्र. जी.जे.१0 एक्स ७७00 ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात राजेश सागवान व शशिकला बाराहाते हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिंदी (रेल्वे) कडून वर्धेकडे जात असलेल्या रुग्णवाहिकेने सेवाग्रामला नेण्यात आले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनासह पळ काढणार्या ट्रेलरच्या चालकाला काही नागरिकांच्या मदतीने केळझर टोल नाक्यावर पकडण्यात आले. सद्या ट्रेलर व त्याचा चालक सेलू पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास सेलू पोलीस ठाण्याचे जमादार खरे व शिपाई जावेद करीत आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क) दुचाकीच्या धडकेत तिघे जखमी वर्धा- सेलसूरा येथील शेतकी शाळेजवळ पंर झालेल्या ट्रॅक्टरचा टायर बदलवित असताना भरधाव दुचाकी चालकाने धडक दिली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी ६.३0 वाजताच्या सुमारास घडली. यात सचीन चंफत चावके याच्यासह आणखी दोघे जखमी झाले. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी ट्रॅक्टर चालक चावके यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालक यादव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.