दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर
By Admin | Updated: April 24, 2016 02:14 IST2016-04-24T02:14:13+5:302016-04-24T02:14:13+5:30
उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर
वाघोडा शिवारातील घटना : जखमीवर नागपूर येथे उपचार सुरू
कांरजा (घाडगे): उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. राकेश शंकर कालभूत (२१) असे मृतकाचे नाव आहे. तर शंकर कालभूत आणि सूरज कालभूत अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रानुसार, राकेश हा वडील शंकर आणि भाऊ सूरज यांना घेऊन दुचाकीने उमरेडकडे लग्नासाठी गेला होता. परत येत असताना वाघोडा गावाजवळ असलेल्या एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात झाला. यात तिघांनाही कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. सूरजवर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.(तालुका प्रतिनिधी)