दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

By Admin | Updated: July 11, 2016 01:57 IST2016-07-11T01:57:32+5:302016-07-11T01:57:32+5:30

दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.

One killed in a bike accident; Two serious | दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

कारंजा (घाडगे) : दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हेटीकुंडी फाट्याजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. रामदास राऊत (५०) रा. ठाणेगाव असे मृतकाचे नाव आहे. प्रभाकर कृष्णराव बगवे (४४) रा. ठाणेगाव व दशरथ इंगळे रा. सावरडोह अशी जखमींची नावे आहे.
पोलीस सुत्रानुसार, प्रभाकर बगवे व रामदास राऊत हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच ४० क्यू ८४२९ ने ठाणेगावकडे जात होते. दरम्यान बगवे हा दुचाकी क्रमांक एम.एच.३१ एटी ७३२० ने भरधाव येत असताना दोन दुचाकीमध्ये धडक झाली. यात रामदास राऊत हे मागे बसले असल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी दशरथवर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.(शहर प्रतिनिधी)

कार अपघात महिला जखमी
घोराड : वर्धा-नागपूर मार्गावर कोंटबा(पाटी) नजीक खड्डा चुकविताना दोन वाहने समारोसमोर धडकली. या अपघातात एक महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
एम.एच. ३१ ईके ३६९२ नागपूर कडून वर्धेला जात असलेली कार रस्त्यावर असलेल्या खड्ड्याात गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ती कार वर्धेवरुन नागपूर कडे जाणाऱ्या एम.एच. २९ आर ६१५९ या क्रमांकाच्या कारवर धडकली. यात चंदा अरुण दिघाडे (४९) रा. यवतमाळ जखमी झाल्या. त्यांना नागपूर येथे रवाना करण्यात आले.

Web Title: One killed in a bike accident; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.