दुचाकी अपघातात एक ठार
By Admin | Updated: March 4, 2016 02:10 IST2016-03-04T02:10:14+5:302016-03-04T02:10:14+5:30
नागपूरकडून हिंगणघाटला जात असलेली भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली.

दुचाकी अपघातात एक ठार
एक गंभीर : कानकाटी शिवारातील घटना
समुद्रपूर : नागपूरकडून हिंगणघाटला जात असलेली भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कानकाटी शिवारात घडली. हिरामण गोमाजी बावणे (५८) वर्षे रा. तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे. जखमी महिलेचे नाव मंदा अशोक गुरुम (सातघरे) (४५) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, हिरामण बावणे हा त्याच्या एमएच ३२ के ४०५० क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर येथून येत होते. त्याच्यासोबत नातेसंबंधातील मंदा गुरुम (सातघरे) नामक महिला होती. कानकाटी शिवारात रस्त्याच्या कडेला युपी-७० बी ९४२६ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. या ट्रकवर हिरमण याची दुचाकी आदळली. यात हिरामन बावणे जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. महिलेला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून सेवाग्राम येथे उपचाराकरिता पाठविले आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस ठाण्याचे जमादार मते, शिपाई अजय घुसे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)