तीन अपघातात एक ठार, दोन महिला जखमी

By Admin | Updated: May 19, 2017 02:17 IST2017-05-19T02:17:28+5:302017-05-19T02:17:28+5:30

जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या विविध तीन अपघाताच्या घटनेत एक इसम ठार झाला तर दोन महिला जखमी आहे.

One killed and two women injured in three accidents | तीन अपघातात एक ठार, दोन महिला जखमी

तीन अपघातात एक ठार, दोन महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/ हिंगणघाट : जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या विविध तीन अपघाताच्या घटनेत एक इसम ठार झाला तर दोन महिला जखमी आहे. हिंगणघाट येथे वणा नदी पुलाजवळ कवडघाट शिवारात दुचाकीला ट्रकने समोरुन धडक दिली. यात दुचाकी चालक अभय कुबडे, रा. वर्धा हा जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
कुबडे हे दुचाकीने वर्धेला जात होते. पुलाक्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि दुचाकीत धडक झाली. यात चालक ठार झाला असून पोलीस निरीक्षक लिंगाडे तपास करीत आहे
वर्धा येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला गंभीररित्या जखमी झाली. तर टिप्परने पादचारी महिलेला धडक देऊन जखमी केले. स्वागत कॉलनी परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या झालेल्या अपघातात माया भोरे या जखमी झाल्या. या प्रकरणी रामनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कार चालकावर कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्य घटनेत कृउबास चौकात टिप्पर क्र.एम.एच ४० बी.जी. ०२५९ च्या चालकाने रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला धडक दिली. यात माधुरी अरूण मानकर (४२) रा. दयालनगर यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: One killed and two women injured in three accidents