जि.प.कर्मचारी संस्थेत एक कोटीची अफरातफर
By Admin | Updated: December 2, 2014 23:11 IST2014-12-02T23:11:23+5:302014-12-02T23:11:23+5:30
वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्था शाखा देवळी येथे दैनिक ठेव जमा करणाऱ्या अभिकर्त्यासहित त्याच्या पत्नीने संगनमताने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी वैद्यपूरा येथील विमल

जि.प.कर्मचारी संस्थेत एक कोटीची अफरातफर
देवळी : वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्था शाखा देवळी येथे दैनिक ठेव जमा करणाऱ्या अभिकर्त्यासहित त्याच्या पत्नीने संगनमताने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी वैद्यपूरा येथील विमल नागो खंडाते यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी या पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची पत्नी अर्चना सोनकुसळे हिला अटक करून दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीनावर सोडण्यात आले. मुख्य आरोपी अभिकर्ता अशोक बापुराव सोनकुसळे हा अद्यापही फरार असून देवळी पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलीस सुत्रानुसार, अभिकर्ता अशोक हा जि.प.सहकारी संस्थेत खातेदारांची दैनिक ठेव जमा करीत होता. सुरुवातीला खातेदारांचा विश्वास संपादित करीत लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या. पैसा बँकेत जमा न करता त्याने घोळ करून वैयक्तिक संपदा गोळ करीत सावकारीचा व्यवसाय सुरू केला.
दरम्यान विमल खंडाते यांनी शेत विक्रीतून मिळालेले सात लाख ५० हजार रुपये सोनकुसळे यांच्याकडे दिले. त्यांनी ते पैसे जमा न करता परस्पर वापरले. याची माहिती खंडाते यांना कहताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी केल असता सानकुसरे याने अनेक खातेदारांच्या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खातेदारांकडून ३० ते ४० लाखापर्यंतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हा अपहार १ कोटीच्या घरात असल्याचे पोलीस निरीक्षक वासेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)