दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक

By Admin | Updated: March 20, 2015 01:43 IST2015-03-20T01:43:29+5:302015-03-20T01:43:29+5:30

येथील मंगल कार्यालयासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने लांबविली होती. या चोरीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली ..

One arrested for theft of a bike | दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक

दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक

वर्धा : येथील मंगल कार्यालयासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने लांबविली होती. या चोरीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव निलेश रघुविरसिंग राठोड (२३) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, रामनारायण पाठक (४८) रा. सेलू हे लग्नाचे कार्यक्रमाकरिता आले होते. यात त्यांची एमएच ३२ जी ८९४९ क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना वर्धेतील महादेवपूरा येथील मक्सूद याच्या चहा टपरीजवळ राहणारा निलेश रघुविरसिंग राठोड (२३) याच्या जवळ एक सिल्वर रंगाची दुचाकी आहे. तिच्यावर एमएच ३२ जी १९६८ असा क्रमांक लिहून असून ती चोरीची असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून निलेश याला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ असलेली दुचाही ही चोरीची असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेत कायदेशीर कार्यवाही करून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निरीक्षक एम.डी. चाटे यांच्या मार्गदर्शन सहायक उपनिरीक्षक उदयसिंग बारवाल, जमादार अशोक वाठ, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, अमर लाखे, समीर कडवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested for theft of a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.