आरक्षणाची सोडत होताच राजकीय मोर्चेबांधणी सुरू
By Admin | Updated: August 30, 2015 02:00 IST2015-08-30T02:00:44+5:302015-08-30T02:00:44+5:30
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने नव्याने पाडण्यात आलेल्या वॉर्डाची आरक्षणाची सोडत झाली.

आरक्षणाची सोडत होताच राजकीय मोर्चेबांधणी सुरू
सेलू नगर पंचायत : आरक्षणामुळे अनेक राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोध
सेलू : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने नव्याने पाडण्यात आलेल्या वॉर्डाची आरक्षणाची सोडत झाली. आता निवडणुका लागण्याची चाहूल लागल्याने राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या आरक्षणानुसार उमेदवाराची शोध मोहीम सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत असताना ६ वॉर्डातून १७ उमेदवार निवडून येत होते; पण नगरपंचायतमध्ये वॉर्डाची फेररचना झाली व १७ सदस्य निवडून देण्यासाठी १७ वॉर्ड पाडण्यात आले. पहिल्यांदा होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये १७ पैकी ९ वॉर्ड महिलाकरिता राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची पंचाईत झाली आहे. गत सहा महिन्यांअगोदर ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्यात येवून प्रशासक म्हणून तहसीलदारांची नेमणूक झाली. वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने लवकरच निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. याकडे लक्ष ठेवून राजकीय नेते उमेदवाराचा शोध घेत असून जात वैधता प्रमाणपत्र बणविण्यासाठी व्यस्त आहेत. सेलू हे तालुका स्थळ असून राजकीय जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा ठेवून आहे. गत दहा वर्ष ग्रामपंचायतीवर जयस्वाल गटाची सत्ता आहे. ही निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर होईल असा कयास लावल्या जात आहे. काँग्रेसचे परंपरागत असलेले दोन गट विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आले आहे. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी या गटात मिळून नुकतीच बाजार समितीवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व भाजपा शिवसेना युती होणार काय, याकडे लक्ष लागले आहे. वर्धा उपविभागात सेलूला राजकीय महत्त्व ठेवून आहे. यामुळे येथील निवड लक्षवेधी ठरणार आहे.(तालुका प्रतिनिधी)