शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मालवाहू कोसळला नदीत; वृद्ध महिलेचा बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 12:25 IST

हा अपघात शनिवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बाभूळगाव (कोंगा) शिवारात झाला.

ठळक मुद्देबाभुळगाव (कों.) शिवारातील घटना टायर फुटल्याने झाला अपघात

सेलू (वर्धा) : तेरा व्यक्तींना घेऊन परतीचा प्रवास करीत असलेल्या मालवाहूचा टायर अचानक फुटला. दरम्यान वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन थेट नदीत कोसळे. यात वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बाभूळगाव (कोंगा) शिवारात झाला.

देवळी तालुक्यातील पळसगाव (आबाजी), तसेच सेलू तालुक्यातील सुरगाव येथील काही भाविक एमएच ३२ एजे २६२२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने नागपूर जिल्ह्यातील वाकी, ता. सावनेर येथे शनिवारी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळ्यानंतर हे सर्व व्यक्ती वाकी येथील दर्गाह येथे दर्शनासाठी थांबले. दर्शनानंतर यात्रा उत्सवाचा आनंद लुटल्यावर या प्रवाशांनी मालवाहू वाहनानेच परतीचा प्रवास सुरू केला.

काही प्रवासी सुरगाव येथे उतरले. त्यानंतर उरलेल्या तेरा प्रवाशांना घेऊन हे वाहन पुढील प्रवास करीत असताना भरधाव वाहन बाभूळगाव (कोंगा) येथील वाघाडी नदीच्या पुलावर आले. दरम्यान, वाहनाचा समोरील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. अशातच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीपात्रात कोसळले. नदीत वाहन कोसळल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदत कार्यात हातभार लावला.

बारा प्रवाशांना सुखरूप नदीबाहेर काढण्यात यश आले असले, तरी लक्ष्मी तानबा लोखंडे (७४) यांचा बुडून मृत्यू झाला. तर, उर्वरित बारा प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाची पत्नी नीलिमा हेमंत पाटील (२८) व चार वर्षीय मुलगी देवांशी यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू