ऑईलसाठा हटविला, अनधिकृत गाळे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:02+5:30

प्रशासनाकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाच्या आदेशानंतर अपार्टमेंट मालकाने ऑईलसाठा हटविला पण, पार्कींगमधील अनधिकृत बांधकाम कायम असल्याने ते बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी सदनिकाधारकांनी केली आहे.

Oil stocks deleted, unauthorized sludge permanently | ऑईलसाठा हटविला, अनधिकृत गाळे कायमच

ऑईलसाठा हटविला, अनधिकृत गाळे कायमच

Next
ठळक मुद्देहेरिटेज प्लाझा येथील प्रकार : अवैध बांधकाम पाडा, सदनिकाधारकांची तक्रारीतून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील कारला चौक परिसरातील हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटच्या मालकाने सदनिकाधारकांच्या पार्कींगमध्ये अनधिकृत गाळे बांधून त्या ठिकाणी विनापरवानगी ऑईलचा साठा करुन ठेवला होता. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाच्या आदेशानंतर अपार्टमेंट मालकाने ऑईलसाठा हटविला पण, पार्कींगमधील अनधिकृत बांधकाम कायम असल्याने ते बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी सदनिकाधारकांनी केली आहे.
शहरातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक विलास मानलवार यांच्या मालकीच्या कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटची निर्मिती केली आहे. या ठिकाणी सहा सदनिका असून त्याची विक्रीही सदनिकाधारकांना करुन दिली आहे. दरम्यान अपार्टमेंट मालक मानलवार यांनी तीन सदनिकाधारकांच्या पार्कींगमध्ये अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे काढून ते स्वत: ताब्यात ठेवले. तसेच त्या गाळ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेल्या इंजिनऑईलचा साठा करुन ठेवला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने कारवाईला गती दिली. नगररचनाकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दिलेल्या सूचनेवरुन या ठिकाणचा सर्व ऑईलसाठा हटविण्यात आला आहे. मात्र, गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम कायम असून ते बांधकाम तत्काळ पाडून सदनिकाधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पी.टी.पांडे, विशाल उराडे, दीपक देशमुख व माधव शेरकुले या सदनिकाधारकांनी तक्रारीतून केली आहे.

पोलीस आले अन् निघून गेले
हेरिटेज प्लाझा येथे ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवल्यासंदर्भात सदनिकाधारकांनी २६ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार २४ एप्रिलला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात ऑईलसाठा आढळून आला होता. पोलीस कर्मचारी पाहणी करीत असतानाच अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन खणखणल्याने कारवाईकरिता आलेल्या पोलिसांना कारवाई न करताच परतावे लागले. त्यानंतर पुढे कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला होता. आता लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कारवाईला गती मिळाल्याचेही सदनिकाधारकांनी बोलून दाखविले आहेत.

Web Title: Oil stocks deleted, unauthorized sludge permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.