पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:39 PM2019-08-08T23:39:24+5:302019-08-08T23:39:50+5:30

दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे.

The offspring of the rain | पावसाची संततधार

पावसाची संततधार

Next
ठळक मुद्देघरांची पडझड : कामे खोळंबली, शेतकऱ्यांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली असून शेतातही पाणी साचले आहे. शेतातील कामे खोळंबल्यामुळे पिकेही आता धोक्यात आली आहे. प्रारंभी पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.
आठही तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून सततधार सुरु आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५२३.१३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५६.८२ असून या सततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी मोठ्या व मध्यम जलाशयाच्या पातळीतही वाढ झाली आहे. पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरल आहे. तर नांद प्रकल्पात ६६.६९ टक्के जलसाठा असल्याने या प्रकल्पाचे ३ गेट २० सेमीने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ५३.६०४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच लाल नाला प्रकल्प ८७.२१ टक्के भरला असून या प्रकल्पाचे ५ गेट १० सेमी. उघडले असून ३०.८० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्धा कार नदी प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने कारंजा तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

आष्टी- साहूर-वरूड मार्ग बंद
सााहूर - धाडी येथील जांब नदीवरील नवनिर्माण पुलाजवळ बनविण्यात आलेला वळणमार्ग आठ दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेल्याने आष्टी-साहूर- वरूड या मार्गावरील वाहतूक पुर्णत: बंद झाली आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गाने वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बुधवारी सकाळी ७ वाजतादरम्यान जांब नदीला पूर आला. या पुरात वळणमार्ग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी व रुग्णांना सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून पंचाळा व झाडगाव रस्त्याने ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांकडून कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. याबाबत आर.आर. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता पाऊस कमी झाल्यानंतर रपटा तयार करण्यात येईल, असे सांगितले. पण, गुरुवारीही पाऊस कायम असल्याने पुन्हा पुराचे पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: The offspring of the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.