शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सोशल मीडियावर अधिकारी, राजकीय व्यक्तींना हॅकर्सकडून केले जातेय लक्ष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

प्रोफाईलवर गेल्यानंतर वर उजव्या बाजूने तीन डॉट (...) दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्या समोर ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाईल’ हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, ‘प्रेटेन्डिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शन दिसतील त्यामध्ये ‘मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी’ आणि आपलीच बनवलेली फेक प्राेफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी ‘मी’ हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि नेक्स्ट करावे. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातच वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, राजकीय व्यक्ती, नेते, सामाजिकदृष्ट्या मोठी नावं असलेल्या व्यक्तींची सोशल मीडियावरील प्रोफाईल हॅक  करण्यात येत आहे. प्रोफाईल हॅक केल्यानंतर सायबर हल्लेखोरांकडून त्या व्यक्तींच्या मित्रांना पैसे मागणीचे मेसेज करून त्यांच्याकडून रक्कम उकळली जात आहे. मात्र, आपले प्रोफाईल सुरक्षित कसे ठेवावे, प्रोफाईल हॅक झाल्यास काय करावे, यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्याचे सायबर तज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्याकडून ‘लोकमत’ने नागरिकांनी  नेमके यावर काय करावे, याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. ज्यांचे प्रोफाईल फेक बनविण्यात आले आहे त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधा, स्वत:ला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट आली असेल त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाईलची लिंक मागवून घ्या. त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर वर उजव्या बाजूने तीन डॉट (...) दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्या समोर ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाईल’ हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, ‘प्रेटेन्डिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शन दिसतील त्यामध्ये ‘मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी’ आणि आपलीच बनवलेली फेक प्राेफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी ‘मी’ हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि नेक्स्ट करावे. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.  त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

फेसबुक प्राेफाईल सुरक्षित कसे करावे, काही सावधगिरीच्या टिप्स

स्वत:ची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तींना दिसू नये म्हणून सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंग नंतर ‘व्हू कॅन सी युअर फ्रेंडलिस्ट’ त्या ठिकाणी गेल्यावर ‘ओन्ली मी’  ऑप्शन सिलेक्ट करावे.

स्वत:चे प्राेफाईल फोटो, कव्हरपेज, अनोळखी व्यक्तींद्वारे कॉपी किंवा डाऊनलोड करु नये, म्हणून सेटिंग त्यानंतर प्राेफाइल लॉकिंग त्याठिकाणी गेल्यानंतर ‘लॉक युअर प्राेफाईल’ करावे.

अनोळखी व्यक्तीने आपल्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू’ नये, म्हणून सेटिंग नंतर प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन सेंड फ्रेंड रिक्वेस्ट’ त्याठिकाणी फ्रेन्डस् ऑफ फ्रेन्ड्स करावे.  स्वत:चे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सिक्युरिटी ॲन्ड लॉगिन’ त्यानंतर ‘टू फॅक्टर ऑर्थेटीकेशन’ करावे. 

स्वत:चा फेसबुक प्रोफाईलवरील ‘ईमेल आयडी’ इतरांना दिसू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन लुक यू अप युझिंग दर ईमेल ॲड्स यू प्राेव्हाइडेड’ त्याठिकाणी ‘ओन्ली मी’ करावे. प्रोफाईलवरील मोबाईल क्रमांक दिसू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन लुक यू अप युझिंग द फोन नंबर यू प्राेव्हायडेड’ त्याठिकाणी ‘ओन्ली मी’ करावे.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम