‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करणार!
By Admin | Updated: May 22, 2015 02:25 IST2015-05-22T02:25:09+5:302015-05-22T02:25:09+5:30
मनरेगातील धडक सिंचन विहिरीचे देयके सहायक कार्यक्रम अधिकारी ठाकूर यांनी थांबविले.

‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करणार!
आष्टी (श.) : मनरेगातील धडक सिंचन विहिरीचे देयके सहायक कार्यक्रम अधिकारी ठाकूर यांनी थांबविले. याबाबत लोकमतने मंगळवारी वृत्त प्रकाशित केले. पंचायत समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी या वृत्ताबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्याशी संपर्क साधला असता आयुक्तांकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले.
सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना ठाकूर वर्धा येथून ये-जा करतात, मुख्यालयी राहत नाही. शासकीय कामांना त्यांच्या बेताल कारभारामुळे खीळ बसली आहे. २०१४-१५ मधील कामांचे देयक अदा केले नाही. यामुळे ग्रा.पं. चा ६०-४० रेशो पूर्णपणे बदलला आहे. विहित कालावधीत कामे पूर्ण न केल्याने उपमुख्य कार्यपालन अधिकारी भुयार यांनी सर्व ग्रामसेवकांना धारेवर धरले होते; पण हा प्रकार सहायक कार्यक्रम अधिकारी ठाकूर यांच्यामुळे झाल्याची माहिती गटविकास अधिकारी सी.टी. येवला यांनी दिली.(प्रतिनिधी)