आॅक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच
By Admin | Updated: October 31, 2015 02:57 IST2015-10-31T02:57:01+5:302015-10-31T02:57:01+5:30
जिल्हा परिषदेत असलेल्या अनियमिततेमुळे सध्या शिक्षकांचे वेतन मिळण्यास विलंब होत आहे.

आॅक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच
विविध समस्यांवर चर्चा : शिक्षक संघाचे जि.प. सीईओंना साकडे
वर्धा : जिल्हा परिषदेत असलेल्या अनियमिततेमुळे सध्या शिक्षकांचे वेतन मिळण्यास विलंब होत आहे. येत्या महिन्यात दिवाळी आहे. निदान त्या महिन्यात शिक्षकांचे वेतन १ तारखेला व्हावे अशी मागणी शिक्षक संघाने जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली. यावर सीईओ संजय मिना यांनी शिक्षकांचे वेतन १ नोव्हेंबरला करण्याची ग्वाही दिली. यात एक दोन दिवस इकडे तिकडे होवू शकतात असेही ते म्हणाले. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा करण्यात आली.
इतर विषयात शालेय पोषण आहाराचे मानधन व धान्यादी पुरवठा याकरिता निश्चित कालबद्ध कार्यक्रम शिघ्रतेने ठरविण्यात येईल व प्रती महिन्याला मानधन सरळ वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरक्त शिक्षकाचे समायोजन ३० सप्टेंबरच्या पटसंख्येवर-विद्यार्थी करण्यात येणार असल्याचे सांगितले. चर्चेच्यावेळी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, वसंत बोडखे, गजानन पुरी, अजय पाटील गावंडे, मंगेश कोल्हे, राजेश वालोकर, कृष्णा देवकर, संतोष कोडापे, दिलीप गावनेर, वामन शेळके, नानाभाऊ आडकिने, सुनील कोल्हे, बंडू सोणवने, हिवाळे यांच्यासोबत संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.