डांबरीकरणाअभावी वहिवाट धोक्याची
By Admin | Updated: May 16, 2016 02:24 IST2016-05-16T02:24:13+5:302016-05-16T02:24:13+5:30
येथून वडगावकडे जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैना झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.

डांबरीकरणाअभावी वहिवाट धोक्याची
शिवसेनेचे तहसीलदारांना साकडे
सेलू : येथून वडगावकडे जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैना झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ कायम डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांद्वारे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना निवेदनातून करण्यात आली.
सेलू ते वडगाव या मार्गाने झडशी, जामणी, आंजी, आर्वी असा प्रवास होत असतो. त्यामुळे या मार्गावर सदैव वर्दळ सुरू असते. पण या तीन कि़मी. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचे आजार बळावत आहे. त्याचप्रकारे सेलू ते रेहकी या मार्गावरही अनेक खड्डे तयार झाले आहे. या दोन्ही रस्त्याची अनेकदा डागडुजी केल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही आजघडीला रस्त्याची दैना पाहून सदर काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे सिद्ध होत आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात तालुका संघटक सुनील पारसे, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत झाडे, बाबाराव सावरकर, अंकुश महाकाळकर, गजानन कैकाडी, सुनील तिमांडे, विलास उईके, अमित बाचले, जीवन महाकाळकर, नागपुरे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)