पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जि.प. समोर धरणे
By Admin | Updated: November 9, 2015 05:14 IST2015-11-09T05:14:53+5:302015-11-09T05:14:53+5:30
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) अंतर्गत कार्यरत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने महिला

पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जि.प. समोर धरणे
वर्धा : सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) अंतर्गत कार्यरत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात १५० महिला सहभागी झाल्या होत्या. शिक्षणाधिकारी प्राथ. यांना निवेदनही देण्यात आले.
वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे माध्यन्ह भोजन शिजविण्याचे अनेक महिला करतात. मात्र या महिला कामगारांना शासन महिन्याकाठी केवळ १ हजार रुपये मानधन देते. यामध्ये धान्य निवडणे, भाजी कापणे, शिजविणे, भांडी स्वच्छ करणे यासोबतच सफाईची कामासह शाळेचे इतरही कामे करून घेतली जातात. कामे न केल्यास कामावरून कमी करण्याची ताकीदही दिली जाते. या महिलांना जीवन जगण्यासाठी दरमहा १० हजार रूपये मानधन देऊन त्यांचे होत असलेले शोषण थांबवावे अशी मागणी सिटूचे नेते सिताराम लोहकरे यांनी या आंदोलनादरम्यान केली.
यासोबतच एप्रिल २०१५ पासूनचे थकित मानधन व इंधन बिलाची रक्कम या महिलांना त्वरित मिळावी, प्रत्येक शाळेत स्वतंत्र पाकगृह, भोजन कक्ष निर्माण करावा, शाळेची साफ सफाई, शौचालय सफाई अशी कामे करण्याची सक्ती केली जाऊ नये, कारंजा तालुक्यातील गवंडी येथील १६ वर्षे काम केलेल्या एका महिलेला कामावरून काढण्यात आले. तिला पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणीही निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी मेश्राम यांना करण्यात आली.
प्रास्ताविक व संचालन सिटूचे भैय्या देशकर यांनी केले. याप्रसंगी शीला पानकावसे, वंदना भगत, शोभा बनसोड, प्रभा आदमने, दुर्गा मरसकोल्हे यांनी आपले विचार व समस्या मांडल्या. निवेदन देताना शिष्टमंडळात प्रमिला भंडारी, अनिता राऊत, संगीता मरसकोल्हे, निर्मला कुडमते, मंजुषा फुसे, जयश्री राऊत, रूख्मा कठाणे, जाई राऊत, दीपाली तरोडकर, प्रमिला घागरे, प्रमिला धुर्वे यांचा समावेश होता. आभार पांडुरंग राऊत यांनी मानले. समस्या दिवाळीपूर्वीच निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी, यांनी चर्चेदरम्यान दिले. निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, मुंबई, शिक्षण संचालक, पुणे यांना पाठविण्यात आल्या.
यशस्वीतेसाठी हेमराज करनाके, गजानन चामटकर, सविता बावणे, रमा फाटे, बेबी सुरजुसे, चंद्रकला भोयर, सुशीला धुर्वे, वंदना सयाम, दुर्गा मरघडे, मंगला सोनटक्के, पुष्पा नेहारे, सुलोचना जुनघरे, कविता किरडे, छबु बावणे, कल्पना हेडाऊ, जीजा गुळभेले, सुशिला राऊत, बेबी शेंदरे आदींनी प्रयत्न केले.(शहर प्रतिनिधी)