न.प. बांधकाम सभापतींच्या कारच्या काचा फोडल्या

By Admin | Updated: June 5, 2017 01:02 IST2017-06-05T01:02:43+5:302017-06-05T01:02:43+5:30

येथील नगर परिषदेचे बांधकाम सभापती निलेश किटे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी दगड मारून काचा फोडल्याचा प्रकार...

NP The construction workers' car was blown up | न.प. बांधकाम सभापतींच्या कारच्या काचा फोडल्या

न.प. बांधकाम सभापतींच्या कारच्या काचा फोडल्या

पोलिसात तक्रार : अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील नगर परिषदेचे बांधकाम सभापती निलेश किटे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी दगड मारून काचा फोडल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला. हा प्रकार सहज की राजकीय वैमनस्यातून अशी चर्चा शहरात जोर धरत आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
निलेश किटे यांचे म्हाडा कॉलनी येथे निवासस्थान आहे. रात्रीच्या सुमारास त्यांनी घरासमोर त्यांची एमएच ३२ वाय ३४३१ क्रमांकाची कार उभी ठेवली होती. आज सकाळी या कारच्या मागच्या काचावर कोणीतरी अज्ञात इसमांनी दगड मारून ती फोडल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चेला उधान आले आहे. हा हल्ला की कोणी मुद्दाम दहशत माजविण्याकरिता हा प्रकार केला, असा संशय निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: NP The construction workers' car was blown up