आता किटकनाशकांची हेल्मेट घालून फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:41 IST2017-10-12T14:39:50+5:302017-10-12T14:41:18+5:30
शेतात किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांची हकनाक बळी गेल्याचे दारुण वास्तव विदर्भातील शेतकºयांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या आकोलीमधील शेतकºयांनी हेल्मेट घालून शेतात फवारणी करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

आता किटकनाशकांची हेल्मेट घालून फवारणी
ठळक मुद्देशेतकºयांच्या मनात भीतीचे ठाणघातक कीटकनाशकांवर बंदी पण सुरक्षेचे उपाय जारी
अरविंद काकडे
वर्धा-
शेतात किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांची हकनाक बळी गेल्याचे दारुण वास्तव विदर्भातील शेतकºयांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या आकोलीमधील शेतकºयांनी हेल्मेट घालून शेतात फवारणी करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
घातक कीटकनाशकांवर कृषी विभागाने बंदी घातली असली तरी, एकूणच किटकनाशक या प्रकाराबद्दल शेतकºयांच्या मनात आता धास्ती बसली आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेताना त्यांनी हेल्मेटचा असा वापर करून अन्य शेतकºयांनाही सुरक्षेचा संदेश दिला आहे.