बंटीची आत्महत्या नसून हत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:12 IST2019-06-03T00:12:20+5:302019-06-03T00:12:52+5:30
विनयभंग प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ करण टेनपे यांनी आत्महत्या नसून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बोपापूर (दिघी) येथील ग्रामस्थांनी तसेच मृताच्या कुटुंबीयांनी देवळी पोलीस ठाण्यात रविवारी ठिय्या आंदोलन केले.

बंटीची आत्महत्या नसून हत्याच
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : विनयभंग प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ करण टेनपे यांनी आत्महत्या नसून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बोपापूर (दिघी) येथील ग्रामस्थांनी तसेच मृताच्या कुटुंबीयांनी देवळी पोलीस ठाण्यात रविवारी ठिय्या आंदोलन केले.
गुरुवारी सायंकाळी बोपापूर (दिघी) येथील पीडिता बंटी दिलीप टेनपे यांच्या घराच्या आवारात सुकण्यासाठी गेलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तिचा विनयभंग केल्याचा ठपका मृतक बंटी याच्यावर ठेवण्यात आला. शिवाय तशी तक्रारही देवळी पोलिसांत दाखल करण्यात आली. तर शुक्रवारी सकाळी बंटीचा मृतदेह गावाशेजारी आढळून आला. विनयभंगाचा आरोप असलेल्या बंटीने बदनामीपोटी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या गावात होत आहे. परंतु, बंटीने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास गावाबाहेरून आलेल्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी ही हत्या केल्याचेही पुढे येण्याची शक्यता असल्याचा आवाज या आंदोलनाच्या माध्यमातून बुलंद करण्यात आला. बंटीच्या मारेकऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप यावेळी मृताच्या कुटुंबीयांसह आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय, नारेबाजी करून या घटनेतील संशयित आरोपी सचिन मून, शीला लोखंडे, सचिनची आई आदींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी आंदोलकर्त्यांची बाजू जाणून घेत योग्य कार्यवाहीचे आश्वास दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.