केवळ स्वाक्षऱ्याच नाही तर अंगठेही

By Admin | Updated: May 18, 2016 02:28 IST2016-05-18T02:28:25+5:302016-05-18T02:28:25+5:30

शपथपत्रात स्वाक्षऱ्या असणाऱ्यांत जनाबाई लांडगे यांचा ३० वर्षापूर्वी मृत्यू झाला. सुरेश लांडगे २००३ मध्ये मयत झाले.

Not only the signature but also the thumbs up | केवळ स्वाक्षऱ्याच नाही तर अंगठेही

केवळ स्वाक्षऱ्याच नाही तर अंगठेही

आष्टी (शहीद) : शपथपत्रात स्वाक्षऱ्या असणाऱ्यांत जनाबाई लांडगे यांचा ३० वर्षापूर्वी मृत्यू झाला. सुरेश लांडगे २००३ मध्ये मयत झाले. मथुराबाई लांडगे ४० वर्षापूर्वी मृत्यू पावल्या तर किसनराव कुरवाडे यांचा गतवर्षी मृत्यू झाला. तरीसुद्धा या लोकांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे लावून ते जिवंत असल्याचे नाहकरत शपथपत्र तयार केले. ते १७ डिसेंबर २०१५ रोजी आवश्यक खोटे कागदपत्रे जोडून कनिष्ठ अभियंता अंतोरा कार्यालयात अर्ज सादर केला. शेतकऱ्याचा कृषी पंपाकरिता आलेला अर्ज म्हणून वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दिला.
वीज पुरवठा मिळताच शेतीत हिस्सा असलेल्या लांडगे कुटुंबातील सर्वच सदस्यांना आश्चर्य झाले. याची माहिती घेण्याकरिता लांडगे कुटुंबातील रमेश विनायक लांडगे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात माहितीच्या अधिकारात अर्ज सादर केला. यावर माहिती देण्यात आली. प्राप्त झालेली माहिती पाहून धक्काच बसला. लांडगे कुटुंब हैराण झाले. अर्जावर मृतकांच्या स्वाक्षऱ्या पाहून सारेच दंग झाले.
रमेश लांडगे यांनी या प्रकरणाची माहिती वीज वितरण कंपनीच्य आर्वी शाखेचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांना दिली. रामहरी कुरवाड याने बनावट शपथपत्र जोडल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला. सर्व माहिती ऐकताच हा अधिकारीही अवाक् झाला. त्यांनी या प्रकरणाची दखल धेत सहायक अभियंता आष्टी कार्यालयाचे एस.जी. टेकाडे यांना भ्रमणध्वनीवर सर्व प्रकार या शेतकऱ्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
टेकाडे यांनी प्रकरणाचा तपास अंतोरा कार्यालयाचे अभियंता मधुसुदन पेठे यांच्याकडे दिला. पेठे यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित करून प्राथमिक कारवाई पूर्ण केली असल्याची माहिती आहे.

Web Title: Not only the signature but also the thumbs up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.