प्रभाग ७ मध्ये नो व्हेईकलचा जागर

By Admin | Updated: January 8, 2016 02:55 IST2016-01-08T02:55:30+5:302016-01-08T02:55:30+5:30

शालेय विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढून नागरिकांना ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व पटवून दिले, तर देवळीत खा. रामदास तडस यांच्यासह नगर पालिका,...

No Vehicle Jagar in Division 7 | प्रभाग ७ मध्ये नो व्हेईकलचा जागर

प्रभाग ७ मध्ये नो व्हेईकलचा जागर

वैद्यकीय जनजागृती मंचचा पुढाकार : ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत
वर्धा : शालेय विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढून नागरिकांना ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व पटवून दिले, तर देवळीत खा. रामदास तडस यांच्यासह नगर पालिका, पोलीस व तहसील प्रशासनाने सकाळी सायकलवर शहरात फेरफटका मारुन नागरिकांमध्ये जागर केला. या तिनही ठिकाणी नागरिकांनी ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागरण रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हा दिवस प्रत्येकांनी पाळावा, असा संदेशही दिला.
वर्धेत वर्ल्ड जीम येथून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली महिलाश्रम बुनियादी हिंदी विद्यालयात पोहचली. मुख्याध्यापिका संध्या केवलिया व शिक्षकांनी या रॅलीचे स्वागत केले. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचतर्फे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर ही रॅली महर्षी विद्या मंदिर येथे पोहचली. येथेही पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. मुख्याध्यापक उमेश सिंग यांनी रॅलीचे स्वागत केले. रॅली पुढच्या प्रवासाला निघताना दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणाबाजी केली. याप्रसंगी आयुष्यभर सायकलने प्रवास करुन सुदृढ आरोग्य जोपासणारे ७७ वर्षीय झमनलाल भट यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर रॅलीच्या माध्यमातून वॉर्ड क्र. ७ मध्ये ‘नो व्हेईकल डे’बाबत जागर केला. या रॅलीमध्ये नगरसेविता लता जैन, वर्धा शहरचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. नितीश मेशकर, डॉ. ज्ञानेश्वर तळवेकर, श्याम भेंडे, मोहन मिसाळ, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. निखिल ताल्हन यांच्यासह निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, लायन्स क्लबचे सोहम पंड्या, इमरान राही, निरज शुक्ला यांचा प्रामुख्याने समावेश होता. आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, हरषि इथापे व प्रा. किशोर वानखेडे यांनी रामनगर परिसरात सायकलने जनजागृती करीत प्रदूषणावर आळा घालण्यासाठी हा दिवस पाळण्याचे आवाहन केले.
वायगावात शिक्षकांनी केला संकल्प
वायगाव (नि.) : गजानन भोयर, गौरी सातपुते, केतकी वनमाली, कविता चौधरी, उमेश राऊत, प्रीती वांदाडे शिक्षकांनी सायकलने तर विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक पायदळ येऊन आठवड्यातला हा दिवस सायकलने वा पायी प्रवास करण्याचा संकल्प करीत पर्यावरण वाचविण्याच्या हेतुने एक तरी झाड लावावे, असाही संदेश दिले.
ठाकरे अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वायगाव (नि.) गावापासून २ किलो मी. अंतरावर देवळी मार्गावर आहे. प्राथमिकचे मुख्याध्यापक आर. एन. डुकरे यांनी शिक्षकासह ‘नो व्हेईकल डे’मध्ये सहभाग घेत दर गुरूवारी सायकलने ये-जा करण्याचा निर्धार केला. यात. पी.एस. महाकाळकर मुख्याध्यापक माध्यमिक, बी.एस. मेश्राम, एस.के. ढगे, डी.एस. लांबट, एम.एस. घडोले, व्हि.एस. चव्हाण हे शिक्षक सहभागी झाले. यात ‘नो व्हेईकल डे’ मुळे प्रदूषणाला आळा बसून सायकल वा पायी चालल्याने शरीराच्या हालचालीमुळे आरोग्य चांगले राहते. इंधन बचत होऊन राष्ट्रीय संपत्तीची जपवणूक होईल, असा संदेशही दिला. एक दिवस इंधन वाहनाचा वापर टाळणार, असे आर.एन. डुकरे मुख्याध्यापक यांनी म्हटले. माजी सरपंच गणेश वांदाडे, ग्रा.पं. सदस्य, सुनील तळवेकर, ग्रा.पं. सदस्य नरेश सोनपितळे, आशिष शिंदे, नानाजी ढोले, बाबाराव कारंजकर, प्यारू काझी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी डी.एम. बालपांडे, एम.बी. घोडे, आर.डी. कटरे व इतर कर्मचारी व वायगाव (नि.) ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाची सांगता ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आली. ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व नानाजी ढोले, गणेश वांदाडे व प्रा. वैभव खुळे यांनी सांगितले.
खासदारांसह शासकीय अधिकारही सायकलवर
देवळी : येथील सायकल रॅलीत खा. तडस यांचे सहित नायब तहसीलदार महेंद्र सोनोने, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या कापसे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, आष्टीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जनार्दन ढोक, न.प. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पंकज चोरे, प्रा. नितीन आचार्य, शहर ग्राहक मंचचे प्रवीण फटींग, सुरेंद्र उमाटे, सेवा सहकारीचे अध्यक्ष शरद आदमने, मारोतराव खोंड, आरोग्य कर्मचारी संघटनेचे दिलीप उटाणे, वसंत तरास, आतीश ईटनकर, किरण तेलरांधे, गणेश शेंडे, रवी झाडे, सागर वानखेडे, अक्षय खतंडे, वैभव गडवार तसेच न.प. कनिष्ठ महाविद्यालय व जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी महालक्ष्मी स्टीलचे अधिकारी व नागरिकांनी उपस्थिती होती.
पुलगावात ‘नो व्हेईकल डे’ बाबत शैक्षणिक संस्था सरसावल्या
पुलगाव : या उपक्रमात ह.भू. आदर्श हायस्कूलचे प्राचार्य सुनील दुम्पल्लीवार, अशोक डोंगरे, आर.के. कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रमिला नकाशे, उपप्राचार्य नूरसिंग जाधव, कृष्णा तायल स्कूलच्या प्राचार्य अपर्णा घोष, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्याम देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नितीन बडगे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष सुभाष झांझरी, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढोमणे, राष्ट्रीय मील मजदूर संघाचे अध्यक्ष रामेश्वर वाघ, तिरळे कुणबी समाज सेवा संघाचे प्रशांत डफळे, प्रशांत कुडे यांचेसह शहरातील विविध संस्था, शैक्षणिक संस्था, शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहे. आज उपविभागीय पोलीस अधिकारी कुहीकर व नगराध्यक्ष मनीष साहू यांनी निवासस्थानापासून पायीच कार्यालय गाठून ‘नो व्हेईकल डे’ची सुरूवात स्वत:पासून केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: No Vehicle Jagar in Division 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.