सुरक्षा पंधरवड्यातही ‘नो सिग्नल’

By Admin | Updated: January 5, 2016 02:32 IST2016-01-05T02:32:20+5:302016-01-05T02:32:20+5:30

वर्धा : वाहतूक सुरक्षा पंधरवडा तोंडावर आला आहे. यात वाहतूक पोलिसांकडून शहरवासीयांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्यात

'No signal' in security fortnight | सुरक्षा पंधरवड्यातही ‘नो सिग्नल’

सुरक्षा पंधरवड्यातही ‘नो सिग्नल’

पालिका उदासीनच : वाहतूक पोलिसांच्या पत्रावर अद्याप कार्यवाही नाही
वर्धा : वाहतूक सुरक्षा पंधरवडा तोंडावर आला आहे. यात वाहतूक पोलिसांकडून शहरवासीयांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्यात येणार आहे. येथे मात्र सुरळीत वाहतुकीकरिता आवश्यक असलेल्या सिग्नलने केव्हाच जीव सोडला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नेमकी कशी द्यावी, असा सवाल वाहतूक पोलिसांना पडला आहे. त्यांनी सिग्नल सुरू करण्यासंदर्भात पालिकेला पत्र दिले असले तरी त्यांच्याकडून याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही.
शहरात गत काही वर्षांपासून बंद असलेले वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी बंद असलेले सिग्नल सुरू करण्यासंदर्भात पालिकेला सूचना केल्या. याला अर्धे वर्ष लोटत असले तरी त्यावर पालिकेकडून विशेष कार्यवाही केली नसल्याचे दिसते. शहरातील काही मोठ्या चौकात असलेले सिग्नल काही महिन्यांपूर्वी आपली जागा धरून होते, आता मात्र त्याचे खांबही बेपत्ता झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे शहरात वाहतूक सिग्नल सुरळीत होईल अथवा नाही याबाबत सध्या तरी शंका आहे.(प्रतिनिधी)

दुरूस्तीसंदर्भात अंगुलिनिर्देश
४शहरात असलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी घेण्यास पालिका प्रशासन व पोलीस विभाग एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. हे दिवे दुरूस्त करण्यासंदर्भात असलेली एजन्सी पोलीस विभागाशी संबंधीत असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर सिग्नल दुरूस्तीची जबाबदारी पालिकेची असल्याचे पोलीस विभाग बोलत आहे. यामुळे वर्धा शहरात पुन्हा सिग्नल सुरू होईल अथवा नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

दिव्यांनी जागा सोडली
४शहरातील शिवाजी चौक, बजाज चौक, आर्वी नाका, इंदिरा गांधी चौक आदी भागात वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले होते. यातील आर्वी नाका परिसरात असलेले दिव्यांचे खांब कामय असून इतर भागातील खाबांसह दिवेही बेपत्ता झाले आहेत. यामुळे सिग्नल सुरू करणे पालिकेला सहज शक्य होणार नसल्याचे बोलले जात आहे. याकरिता सर्वच काम नव्याने करण्याची गरज वर्तविली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला खो
४वाहतुकीला नियम लावण्याकरिता वाहतूक नियंत्रक पथदिवे अत्यावश्यक आहेत. वर्धा शहरात मात्र या दिव्यांना ग्रहण लागले आहे. ते बंद असल्याने त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यांनी शहरातील सिग्नल सुरू करण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत; मात्र त्यांच्याकडून केवळ संस्थेच्या वादाचे कारण पुढे करण्यात येत असल्याचे दिसते.

सिग्नल सुरू करण्यासंदर्भात गत तीन महिन्यांपूर्वी पालिकेला पत्र दिले आहे; मात्र त्यांच्याकडून यावर काहीच निर्णय झाला नाही.
- सी. बहाद्दुरे, वाहतूक निरीक्षक, वर्धा

सिग्नल दुरूस्तीची जबाबदारी सांभाळणारी एजन्सी पोलीस विभागाशी संबंधीत होती. त्यांच्याकडून तशी कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. सध्या तरी पालिकेच्यावतीने सिग्नल सुरू करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली नाही.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.

Web Title: 'No signal' in security fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.