चार नगरपंचायतींमध्ये नऊ नामांकन
By Admin | Updated: November 24, 2015 05:06 IST2015-11-24T05:06:36+5:302015-11-24T05:06:36+5:30
जिल्ह्यात पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या चार नगरपंचायतीकरिता निवडणूका झाल्या. त्या नगरपंचायतीच्या

चार नगरपंचायतींमध्ये नऊ नामांकन
वर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या चार नगरपंचायतीकरिता निवडणूका झाल्या. त्या नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाच्या नजरा अध्यक्षांच्या निवडीकडे लागल्या आहेत. याकरिता सोमवारपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी चारही ठिकाणाहून नऊ अर्ज दाखल झाले आहे. कारंजा येथे एक, आष्टी व सेलू येथे प्रत्येकी तीन तर समुद्रपूर येथे दोन नामांकन दाखल झाले आहेत.
यात कारंजा येथे काँग्रेसच्यावतीने बेबी कठाणे यांचा एकमेव अर्ज आला आहे. येथे काँग्रेसकडे १५ सदस्य आहेत. यामुळे अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड होणार असल्याचे चित्र आहे. आष्टी येथे काँग्रसच्या वाट्याला दहा तर भाजपच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. येथे कॉग्रेसच्यावतीने एकमेव मीरा येणुरकर तर भाजपच्यावतीने मनीष ठोंबरे व वंदना संजय दारोकर या दोघांनी नामांकन दाखल केले. समुद्रपूर येथे भाजपच्यावतीने शीला मधूकर सोनारे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरिता राहूल लोहकरे यांनी नामांकन दाखल केले. सर्वांचे लक्ष असलेल्या सेलू तालुक्यात सर्वाधिक सहा उमेदवार निवडून आलेल्या दप्तरी गटाचे शैलेंद्र दप्तरी तर जयस्वाल गटाच्यावतीने राजेश जयस्वाल तसेच भाजपा गटाच्यावतीने सैला शब्बीर अली सय्यद यांनी नामांकन दाखल केले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
हिंगणघाट नगराध्यक्षपदाकरिता दोन नामांकन
४हिंगणघाट- येथील नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अॅड. सुधीर कोठारी यांनी तर अपक्ष विठ्ठल गुळघाने यांनी सोमवारी नामांकन दाखल केले. या दोघांचेही नामांकन अर्ज छाननी नंतर वैद्य ठरले आहेत.
४नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी २ वाजेपर्यंत होती. सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान अॅड. सुधीर कोठारी यांनी मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्याकडे दोन उमेदवारी अर्ज सादर केले. त्यापैकी एकावर कॉँग्रेसच्या बलराज अवचट यांची सुचक व शिवसेनेच्या शंकर मोहमारे यांची अनुमोदक म्हणून तर दुसऱ्या अर्जावर अपक्ष निलेश ठोबरे सुचक व मनसेचे अनील भोंगाडे यांची अनुमोदक म्हणून साक्षरी आहे. नामांकन अर्ज दाखल करताना अॅड. कोठारी यांचे सोबत माजी आमदार राजु तिमांडे, समुद्रपूर बाजार समिती सभापती हिमत चतुर, शिवसेनेचे सुनील अनासने, शंकर मोहमारे, कॉँग्रेसचे बलराज अवचट उपस्थित होते.
४त्यानंतर ११.५० वाजताचे दरम्यान अपक्ष उमेदवार विठ्ठल गुळघाने यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून भाजपाच्या संगीता साठे तर अनुमोदक म्हणून बादलसिंग रेवते यांची स्वाक्षरी आहे. गुळघाने यांची उमेदवारी दाखल करताना भाजपा आ. समीर कुणावार, पूर्ती साखर कारखान्याचे संचालक किशोर दिवे, माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, सुभाष कुंटेवार, प्रा. किरण वैद्य, चंद्रकांत माळवे व भाजपा नगरसेवक उपस्थित होते.
४सद्य स्थितीत या नगरपरिषदेत शिवसेनेचे ६, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ६, कॉँग्रेस ५, मनसे १, भाजपा ३ व अपक्ष ६ असे २७ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, कॉँग्रेस, मनसे व अपक्षाच्या आघाडीच्यावतीने अॅड. कोठारी यांनी तर भाजपा व अपक्षांसह विठ्ठल गुळघाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोघामध्ये सरळ होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तिथी २७ नोव्हेंबर असून नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ३० नोव्हेंबरला दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.