शेतकरी आरक्षणाचे नऊ ग्रा.पं. मध्ये ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:41 PM2018-10-04T23:41:28+5:302018-10-04T23:42:27+5:30

गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे.

Nine GPs of farmers' reservation Passed the resolution in | शेतकरी आरक्षणाचे नऊ ग्रा.पं. मध्ये ठराव पारित

शेतकरी आरक्षणाचे नऊ ग्रा.पं. मध्ये ठराव पारित

Next
ठळक मुद्देतीन तालुक्यांमध्ये मागणी : महिला सरपंचाचा मोठा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये शेतकरी आरक्षणाची भूमिका विषद करण्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल उपस्थित होते. झुनका येथे सरपंच अर्चना नारनवरे, रमेश नगराळे, रितेश डुलके, चंद्रकांत मुंगे, शंशाक उरकुडे, सविता नगराळे उपस्थित होते. जीवन थुल, सचिन महले, सुनिल शिंदे, राजकुमार जामुळे, दिपक तामगाडगे, शुभम जामुनकर, वर्षा गराटे यांनी या ठरावाचे समर्थन केले.
कोरा येथे जि.प. सदस्य रोशन चौके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ पंढरे, रविंद्र चौधरी, आतिष शंभरकर, प्रशांत डफ, बाबाराव लोखंडे, संदीप कडवे, अरविंद येवले, पं.स. सदस्य वसंत घुमडे, महेंद्र वैरागडे, ज्ञानेश्वर गुंडे, ब्रम्हानंद सुर्यवंशी, मोरेश्वर तिमांडे आदी उपस्थित होते. निंबा येथे उपसरपंच निळकंठ मोहितकर, ग्रा.पं. सदस्य गजानन दांडेकर, सुरेश डायगव्हाणे, प्रभाकर उरकुडे, विठ्ठल खारकर, विनोद पुरी, विमल नारनवरे, ज्ञानेश्वर वानकर, सुधाकर डेहणे, प्रविण गोडबोले, लक्ष्मण कुरडकर आदी उपस्थित होते. सरपंच रेखा उरकुडे यांनी एकमताने ठराव पारित झाल्याची माहिती दिली.
कवठा येथे प्रविण जायदे यांच्या पुढाकारातून सभा झाली. यावेळी अरविंद पन्नासे, आशिष खडसे, शंकर भगत, दादाराव घाटे, किशोर केराम, जिवन धारे, साईबाबा भगत, प्रविण आडकिणे, गजानन कष्टी, नरेंश रामटेके, उपसरपंच नितीन माहुरे, प्रफुल ठाकरे, सरपंच रूपाली जायदे आदी उपस्थित होते. उसेगाव येथे श्रीराम वरघणे, संजय कारमेंगे, विलास तिमांडे, रविंद्र चंदनखेडे, किशोर राऊत, राजेराम कंगाले, सुनिता चौधरी, विमल मेंढुले, सुषमा सहारे, सुनिता तलांडे, रामभाऊ महाकाळकर आदी उपस्थित होते. कारंजा तालुक्यातील उमरी येथे गुरूदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने सभा पार पडली. यावेळी ग्रा.पं. सदस्य शेषराव राऊत, विश्वेशवर भक्ते, गजानन डोंगरे, दिलीप चोपडे, किशोर गोहते, देवानंद खंडाईत, धनजरा हिंगवे, बाबाराव राऊत यांनी शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. त्याला मोहन गाखरे, विलास चोपडे, नरेश कासटकर, किशोर देवासे, मिथून ढोबळे, विठ्ठल डोंगरे, देवानंद कामटकर, राहुल भांगे, गजानन हिंगवे आदींनी समर्थन केले. सरपंच भरतराम डोंगरे, उपसरपंच दिलीप देवासे यांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या. बोरी येथे पुरुषोत्तम कडवे भागवत डोंगरे, रोशन पोहणकर, अमित गाखरे, दिलीप धोटे, विश्वनाथ किनकर, रामराव बैगने, बालपांडे यांनी आरक्षणाचा ठराव मांडला. त्याला उपसरपंच मनोज धंडाळे यांनी अनुमोदन दिले. सरपंच मिरा हिंगवे यांनी ठराव मंजूर केला. यावेळी पंजाब देशमुख, जनार्दन धोटे, रमेश देशमुख यांनी विधानसभा व लोकसभेत हा ठराव पारित व्हावा असे आवाहन केले.
खैरी येथे उपरपंच संजय पाठे यांनी हा ठराव मांडला. याशिवाय मोझरी (शेकापूर) येथेही शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. उपसरपंच शुध्दबुध्द कांबळे, अनिल दुरगे, गजानन ठाकरे, लक्ष्मण अंबाडरे, अशोक थोरात, केशव ठाकरे, दिगांबर गुघाणे, मारोतराव कुसराम, उमेश बोबडे, सुर्यकांत उमरे, रमेश पोहणकर, प्रशांत ससाने, अमोला मुन, राजेंद्र मैत्रे, सदानंद शेळके, शुुभम बरडे, शरद फुलकर, मोहन वाटकर, उमेश चिव्हाने आदी उपस्थित होते. सरपंच पुष्पा येरमे यांनीे समर्थन केले.

Web Title: Nine GPs of farmers' reservation Passed the resolution in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.