शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत पोलिओ संशयित नऊ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले.

ठळक मुद्देनमुने ‘निगेटिव्ह’: राबविली जातेय विशेष लसीकरण मोहीम

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिओमुक्त देश म्हणून भारताला जाहीर करण्यात आले असले तरी पोलिओ या आजाराची लागण कुणाला होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. शिवाय विशेष लसीकरण मोहीम राबविली जाते. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पोलिओ संशयित नऊ केसेस जिल्ह्यात आढळले. या नऊ रुग्णांचे शौच नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. हे सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले आहे.भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले. १५ वर्षाखालील बालकांना अर्धांगवायूचा झटका आल्याव व प्रकृती खालवल्यास त्याच्या शौचाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविले जातात. जानेवारी २०१९ ते आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातून एकूण नऊ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही नमुने तपासणीत ‘निगेटिव्ह’ असल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.खासगी रुग्णालयांना माहिती देणे बंधनकारकपोलिओ संशयित रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर शासकीय यंत्रणेला त्याची माहिती वेळीच व तातडीने मिळत नव्हती. ही बाब पुढे आल्यावर आरोग्य यंत्रणेकडून खासगी रुग्णालयांनी ही माहिती देण्याच्या अनुषंगाने बंधनकारक करण्यात आले आहे.वर्षातून दोनवेळा राबविली जाते मोहीमपाकिस्तान, अफगानिस्तान व बांगलादेश येथे आजही मोठ्या प्रमाणात पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार भारतात होऊ नये म्हणून वर्षातून किमान दोन वेळा देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येते. विषेश म्हणजे २०१३ नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही.० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना देतात पोलिओची प्रतिबंधक लसपोलिओमुक्त भारत हा उद्देश कें्रदस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. प्रत्येक बालकाला पोलिओची लस द्याच, असे आवाहन चित्रपट जगतातील महानायक अभिताभ बच्चन हे करतात.आठवडाभराचा लागतो वेळ१४ दिवसात संशयिताचा शौच नमुना घेऊन तो तपासणीकरिता मुंबई येथे पाठविला जातो. अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असल्यास त्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला तातडीने माहिती दिली जाते. तर इतर वेळी अहवाल मिळण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.भारत देश २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान मध्ये १२ तर अफगानिस्तान मध्ये २१ पोलिओच्या केसेस पुढे आल्या. तसेच २०१९ मध्ये पाकिस्तानात ५३ तर अफगानिस्तानात १३ केसेस आढळल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत पोलिओचा प्रसार होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली. शिवाय पुढेही यशस्वी करण्यात येईल. पाठविण्यात आलेले नऊ नमुने निगेटिव्ह आले आहेत.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य