रोह्याचे मांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:16+5:30
प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा घालून मांस जप्त केले.

रोह्याचे मांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी/कारंजा : चिंचोली येथे रोह्याचे मांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. वनविभागाने गरुडझेप संघटनेच्या माहितीवरून गुरुवारी ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा घालून मांस जप्त केले.
या प्रकरणात राजेश कोवे, साहेबराव मसराम, राहुल मसराम, देवानंद कोकाटे, अर्जुन उईके, बेजू उईके, सुरेश उईके, कमलसिंग धुर्वे व शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांना अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.व्ही. लोणकर के. बी. कांबळे, के. एल. उईके, एम. डी. धामंदे, पी. पी. कळसाईत यांनी ही कारवाई केली. यावेळी गरूडझेप संघटनेचे कार्यकर्ते तुषार साबळे, अनिल माहुरे, गोपाल, दखणे, विक्की मसराम, आशीष मोहेकर, सूर्या शेंडे, रवी शिपेकर, रमन मेडे, ऋतिक वडनोर, तेजस चव्हाण, मिलिंद मसराम व शैलेश मसराम उपस्थित होते.
बिबट्यानंतर रोह्याची शिकार
पंधरवड्यापूर्वी मांडवा शिवारात बिबट्याची शिकार करण्यात आली. या घटनेत बिबट्याचे पंजे आणि मुंडके छाटण्यात आले. वनविभागाच्या चमूने तपासादरम्यान जप्त केले. आता रोह्याची शिकार करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात शिकाऱ्यांच२ी टोळी सक्रिय असल्याची बाब स्पष्ट होत असून वनविभागाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.