निखिलची निराळी ‘कन्सेप्ट’ ठरतेय इतरांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:06+5:30
निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी आॅनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर चालणारी एक सायकल बधितली. त्याच क्षणी त्याने लिटिल कार तयार करण्याचे निश्चित करून पुढे प्रत्यक्ष कृतीला सुरूवात केली.

निखिलची निराळी ‘कन्सेप्ट’ ठरतेय इतरांसाठी प्रेरणादायी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरातील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी असलेल्या निखिल नरेंद्र सोमनाथे याने आपल्या डोक्यातील कन्सेप्टला मूर्तरुप देऊन ‘लिटिल कार’चा यशस्वी आविष्कार केला आहे. नववीचे शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय बालकाचा आविष्कार विविध शाखेचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी पे्ररणादायी ठरत आहे.
निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर चालणारी एक सायकल बधितली. त्याच क्षणी त्याने लिटिल कार तयार करण्याचे निश्चित करून पुढे प्रत्यक्ष कृतीला सुरूवात केली. लिटिल कारच्या निर्मितीसाठी त्याने मेटल रॉड, लोखंडी अँगल, छोट्या मुलांची सायकल, कारचे स्टेअरिंग, प्लायवुड, शिलाई मशीनचे दोन रॉड, नटबोल्ड, लॅम्पिंग, प्रोजेक्ट लॅम्प, ई-बाईक मोटर-२४ वोल्ट आदी साहित्याचा वापर केला. सलग ३० दिवसांच्या परिश्रमाअंती लिटील कार तयार केली. त्यानंतर त्याची ट्रायल घेतली. वर्धा शहरातील रस्त्यावर धावणारी ही लिटिल कार सध्या अनेकांना भुरळ घालत आहे.
लिटिल कारच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली ई-बाईक मोटर-२४ वोल्ट ही मोटार निखीलने ऑनलाईन पद्धतीचा वापर करून जापान येथून खरेदी केली.
निखिलने तयार केलेली ही लिटिल कार बॅटरीसह सौरऊर्जेवरही चालत असल्याचे तो सांगतो. एकूणच १५ वर्षीय निखीलचा हा यशस्वी प्रयोग अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.