शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सत्याग्रही घाटात रात्रीचा थरार; चालकाची हत्या करून ट्रक नेला चोरून, परिसरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:09 IST

एम.एच. ४०  एन. ३२१० क्रमांकाचा ट्रक घेऊन चक्रधरसिंग हा नागपूर येथून अकोल्यासाठी लोखंडी पाइपचा माल भरून घेऊन जात होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी मृ़तक चक्रधरसिंग  हा एकटाच निघाला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ट्रकमध्ये पाइपचा माल भरून अकोला येथे जाण्यासाठी निघाला. मात्र, दोघांनी धारदार शस्त्राने चक्रधरसिंगच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करून लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक चोरून नेला.  

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) :  लोखंडी पाइप घेऊन अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाची निर्घृणपणे हत्या करून अख्खा ट्रकच चोरून नेला. ही घटना तळेगाव येथील सत्याग्रही घाटात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी ८ रोजी तळेगाव पोलिसांनी एका आरोपीस नागपूर जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती दिली. चक्रधरसिंग रामसजीवनसिंग असे मृत चालकाचे नाव आहे. तर पोलिसांनी सुनील गामा भारव्दाज, रा. वलनी खदान, सावनेर, जि. नागपूर याला अटक केली असून विकास उर्फ ईसरार शेख, ह. मु. कारंजा (घा) याचा शोध सुरू आहे. पोलीस सूत्रांनुसार, नागपूर येथील जसविंदरसिंग हरिसिंग सैनी व जसवीरसिंग सासन हे दोघे मित्र मिळून सासन ट्रान्सपोर्ट चालवतात. त्यांचा एम.एच. ४०  एन. ३२१० क्रमांकाचा ट्रक घेऊन चक्रधरसिंग हा नागपूर येथून अकोल्यासाठी लोखंडी पाइपचा माल भरून घेऊन जात होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी मृ़तक चक्रधरसिंग  हा एकटाच निघाला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ट्रकमध्ये पाइपचा माल भरून अकोला येथे जाण्यासाठी निघाला. मात्र, दोघांनी धारदार शस्त्राने चक्रधरसिंगच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करून लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक चोरून नेला.  ट्रकमालकाला पारशिवनी पोलीस ठाण्यातून फोन आला आणि लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक उभा असल्याचे सांगितले. ट्रकमालक जसविंदरसिंग सासन हे पारशिवनी ठाण्यात गेले असता सुनील गामा भारव्दाज आणि विकास उर्फ ईसरार शेख यांनी ट्रक चोरून आणत सदर माल पारशिवनी परीसरात विक्री करताना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून गेल्याची माहिती दिली. काही वेळाने पारशिवनी पोलिसांना तळेगाव पोलिसांचा फोन आला असता इंदरमारी परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाठविलेल्या फोटोतून मृतक चक्रधरसिंग असल्याचे समजले. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस