नववर्षाची अखेर अवकाळी पावसाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:08+5:30

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोराडसह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

New Year's End With Rain | नववर्षाची अखेर अवकाळी पावसाने

नववर्षाची अखेर अवकाळी पावसाने

Next
ठळक मुद्देकोसळल्या सरी : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. परंतु, त्यानंतर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. तर आता चणा, तूर, गहू आणि कपाशी पिकावर भिस्त असताना मागील काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अशातच सरत्या वर्षाच्या अखेरचा दिवस असलेल्या मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी भर पडली आहे.
वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाच्या थोड्याफार सरी बरसल्या. आर्वीसह तालुक्यात मध्यरात्री वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा गहू, चणा, तूर आणि कपाशी पिकाला फटका बसला आहे. तर सततच्या ढगाळी वातावरणामुळे उभ्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शेतकरी सांगतात.
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोराडसह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.
सध्या कापूस वेचणीच्या कामाला कापूस उत्पादक शेतकºयांकडून गती दिली जात आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापूस वेचणाºया मजुरांनीही घरचा रस्ता धरला. अचानक आलेल्या पावसामुळे बोंडातून बाहेर आलेला कापूस ओला झाल्याने कपाशी उत्पादकांना फटकाच सहन करावा लागणार आहे.
 

Web Title: New Year's End With Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस