शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विधान सभेच्या पार्श्वभूमीवर ठरणार नवा नगराध्यक्ष

By admin | Updated: July 17, 2014 00:16 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धेचा नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नवे नगराध्यक्षपद अनुसूचित

राजेश भोजेकर - वर्धाआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धेचा नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नवे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गातील एक नगरसेवक त्रिवेणी कुत्तरमारे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर काँग्रेसकडे योगिता बागडे आणि वर्षा खैरकार यांच्या रुपाने दोन दावेदार आहेत. यापैकी कोण नव्या नगराध्यक्ष होणार यापेक्षा त्या राष्ट्रवादी की काँग्रेसच्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पालिकेवर राकाँ, बसपा व अपक्षाच्या साह्याने भाजपचा झेंडा आहे. नव्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ही अभद्र युती कायम राहिल्यास राकाँच्या त्रिवेणी कुत्तरमारे या मजबूत दावेदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असल्यामुळे राष्ट्रवादी भाजपशी हातमिळवणी करुन आपला नगराध्यक्ष विराजमान करतो वा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेस या आघाडीतील मित्र पक्षाशी नव्याने हातमिळवणी करुन नगराध्यक्षाची निवडणूक लढते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राकाँ आणि काँग्रेस आघाडी एकत्र आल्यास नगराध्यक्ष कुणाचा हा नवा वाद पुढे येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. तेव्हा भाजपशी हातमिळवणी करायची वा काँग्रेस या मित्रपक्षाला जवळ करायचे, अशा द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सापडली आहे. नगर पालिकेत काँग्रेस-१३, राकाँ-९, भाजपा - ८, बसपा - ४, सेना -१, गुलशन आघाडी - ३, अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष पदाच्या मागील निवडणुकीतील चित्र कायम राहते वा नवे समीकरण जुळून येते, यावरच नव्या नगराध्यक्षाचा चेहरा पुढे येणार आहे.