बचत गट महिलांसाठी नवीन आधार

By Admin | Updated: February 3, 2016 02:26 IST2016-02-03T02:26:15+5:302016-02-03T02:26:15+5:30

संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आता दाही दिशांमध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करीत आहेत.

A new basis for women in savings groups | बचत गट महिलांसाठी नवीन आधार

बचत गट महिलांसाठी नवीन आधार

धर्मपाल डंभारे : तरोडा येथील महिला मेळावा
सेवाग्राम : संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आता दाही दिशांमध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करीत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना जगण्याचा नवीन आधार मिळालेला आहे, असे मत सामुदायिक वैद्यकीय विभागाचे डॉ. धर्मपाल डंभारे यांनी व्यक्त केले.
कस्तुरबा रुग्णालयाच्या सामुदायिक वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विमा योजना सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा (गोडे) अंतर्गत तरोडा येथे महिला मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला सरपंच सुनीता टिकले, शारदा कामडी, सुचिता बोभाटे, सुलोचना ठाकरे, प्रशांत सुरकार आदी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये सुरेंद्र बेलुरकर यांनी बचत गटाचे कार्य आणि खेळ याबाबत माहिती दिली. स्वाती राऊत यांनी एड्स निर्मूलन तसेच गर्भ धारणेमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. आदर्श गाव निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच टिकले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वाती राऊत यांनी मानले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रमोद तिमांडे, ग्राम आरोग्य पाणी पुरवठा समितीचे सभासद, विमा योजना, बचत गटाचे सदस्य, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, आशा वर्कर आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: A new basis for women in savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.