दारू आणणाऱ्या मायलेकासह शेजाऱ्याला अटक
By Admin | Updated: September 25, 2014 23:28 IST2014-09-25T23:28:08+5:302014-09-25T23:28:08+5:30
विधानसभा निवडणूक व नवरोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता दारूबंदी विशेष पथकाच्यावतीने कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. यात वर्धेत दारू आणणाऱ्या गोंड प्लॉट

दारू आणणाऱ्या मायलेकासह शेजाऱ्याला अटक
वर्धा : विधानसभा निवडणूक व नवरोत्सवादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता दारूबंदी विशेष पथकाच्यावतीने कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. यात वर्धेत दारू आणणाऱ्या गोंड प्लॉट येथील माय लेकासह त्यांना सहाकार्य करणाऱ्या शेजाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांची नावे गजेंद्र अरविंद खानखोजे व त्याची आई दुर्गा अरविंद खानखोजे तसेच शेजारी लता राजू पुरके तिघेही रा. गोंडप्लॉट अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सुदामपुरी येथे गुरुवारी सकाळी करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेला गजेंद्र खानखोजे, दूर्गा खानखोजे व लता पुरके हे तिघे नागपूर येथे दारू आणण्याकरिता गेल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन दारूबंदी विशेष पथकाचे कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून सुदामपूरी येथे सापळा रचून बसले होते. यात गुरुवारी सकाळी हे दारू विक्रेते दारू घेवून आले. त्यांना पकडताच त्यांच्याजवळून विदेशी दारूसाठा दुचाकी असा एकूण ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूविके्रत्यांची दारू आणण्याची ही पहिली वेळ नसून त्यांच्यावर यापूर्वी दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर शहर ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उननिरीक्षक गजानन जाधव, प्रवीन लिंगाडे, एस.बी. मुल्ला, राजू दहिलीकर, सहायक निरीक्षक अशोक साबळे, जमादार नामदेव किटे, सुनीता ठाकरे, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, जयस्वाल, विलास गमे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)