शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
By Admin | Updated: August 9, 2015 02:11 IST2015-08-09T02:11:05+5:302015-08-09T02:11:05+5:30
शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून ...

शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
शिक्षक संघाचा मेळावा : राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
वर्धा : शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून काम भागणार नाही तर त्याकरिता शिक्षकांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी सघंटित होणे आवश्यक आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील एका सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्य सरचिटनिस मधुकर काचोळे, विदर्भ नेते बी. रा. भालतडक, पुणे विभागाचे माधव पाटील जिल्ह्याचे नेते शेषराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याच्या नेत्यांनी शिक्षकांना सोसाव्या लागत असलेल्या अनेक समस्यांची माहिती दिली. शिवाय त्या सोडविण्याकरिता संघाकडून प्रयत्न होत असल्याचेही सांगितले. या समस्या सोडविण्याकरिता सोमवारी सकाळी संघाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याच वेळी शिक्षकांच्या १६ व्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली. ते अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या सभेचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे लोमेश वराडे यांनी केले. त्यांनी संघाच्या वतीने शिक्षकांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिवाय वर्षभरात संघाच्यावतीने उभारलेल्या लढ्यातून शिक्षकांच्या सुटलेल्या समस्यांचा उहापोह केला. कार्यक्रमाचे संचालक मोहन कोठे व वर्षा काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन पुरी यांनी माणले.
या कार्यक्रमाला वसंत बोडखे, अजय गावंडे, संजय गायकवाड यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)