संस्कारशून्य पिढी थांबविण्यासाठी एकत्रित होणे आवश्यक
By Admin | Updated: March 29, 2017 00:57 IST2017-03-29T00:57:27+5:302017-03-29T00:57:27+5:30
सध्या खासगीकरणाच्या माध्यमातून गावोगावी इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. यातून नैतिक मुल्यांचा ऱ्हास होत असल्याचे पाहायला मिळते.

संस्कारशून्य पिढी थांबविण्यासाठी एकत्रित होणे आवश्यक
विलास देशमुख : अभ्यासवर्गात व्याख्यान
वर्धा : सध्या खासगीकरणाच्या माध्यमातून गावोगावी इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. यातून नैतिक मुल्यांचा ऱ्हास होत असल्याचे पाहायला मिळते. येथून संस्कारशून्य पिढी घडविल्या जात आहे. हे थांबविण्यासाठी समाजातील बहुजन वर्गाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, असे मत प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ला अभ्यासवर्ग घेण्यात येतो. यात ‘आजची शिक्षणव्यवस्था समाजाभिमुख आहे का’ यावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. शिक्षण जीवनकेंद्री असावे. शिक्षणातून सुसंस्कार होऊन माणूस घडला पाहिजे. परंतु कौशल्य विकासाच्या नावाने बहुजन समाजाची बुद्धीमत्ता दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत वेळीच जागरुक होण्याची गरज देशमुख यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण चवडे तर डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रा. किशोर वानखडे, प्रा. प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सुनील सावध यांनी तर आभार प्रा. अजय सावरकर यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)