मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज
By Admin | Updated: July 3, 2014 23:42 IST2014-07-03T23:42:59+5:302014-07-03T23:42:59+5:30
देशातील विभिन्न समाजिक, धार्मिक, संस्कारीत ब्राम्हण समाजबांधवांनी एकत्र यावे. सुसंस्कृत रूपाने गतीशील, कर्मशील सहयोगी होवून गुरूकुल परंपरेचे दायित्व स्वीकारून समस्त समाजाचे मार्गदर्शक बनने

मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज
शंकरप्रसाद अग्निहोत्री : जिल्हा ब्राह्मण सेवा मंचचा मेळावा
वर्धा : देशातील विभिन्न समाजिक, धार्मिक, संस्कारीत ब्राम्हण समाजबांधवांनी एकत्र यावे. सुसंस्कृत रूपाने गतीशील, कर्मशील सहयोगी होवून गुरूकुल परंपरेचे दायित्व स्वीकारून समस्त समाजाचे मार्गदर्शक बनने हेच परब्रम्ह शक्तीचे द्योतक आहे. ही निष्ठा जपून वसुधैव कुटुंबकम ही भावना बाळगुण मानवजातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र येवून कार्य करणे ही काळाची गजर आहे. समस्त संसारामध्ये प्रेम भावना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा ब्राह्मण सेवा मंचचे अध्यक्ष व जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
वर्धा जिल्हा ब्राम्हण सेवा मंच द्वारा प्रथम परिचय मेळावा स्थानि क बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनियरींग नागठाणा रोड, सिंदी (मेघे) येथील सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या सभेत चार प्रस्ताव पारीत करण्यात आले. यामध्ये ब्राम्हण समाजाची माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, ब्राम्हण समाजातील मुलांना शिक्षित करून त्यांना प्रतिभाशाली बनविण्याचे कार्य, ब्राम्हण समाजातील मुलांना संस्कारीत करून धर्मज्ञानी करणे, वेद पुराण, रामायण, महाभारत, गीता, मदभागवताचे ज्ञान देणे, समाजाला एकत्रित करून सामाजिक कार्य हेतू सभा भवनाचे निर्माण कार्य तसेच आवश्यक निधी उपलब्ध करणे. प्रस्तावांचा समावेश होता. संचालन व आभार प्रा. श्रीकांत नायक यांनी केले. सरिता दुबे, ज्योती मिश्रा, रश्मि पांडेय, वैशाली नायक, आशेक दुबे, शिवमोहन शुक्ला, विजयप्रसाद अग्निहोत्री नारायण पांडे, प्रभुदयाल तिवारी, श्यामकुमार, अवस्थी आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)