समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली दोन गटात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 02:47 PM2021-11-26T14:47:37+5:302021-11-26T18:05:26+5:30

निवडणुकीत सतरा वार्डात ॲड. सुधीर कोठारी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट माजी आमदार राजू तिमांडे यांनीही १७ वार्डातून उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे.

NCP divided into two groups In Samudrapur taluka | समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली दोन गटात?

समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली दोन गटात?

Next

वर्धा : नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे दोन गट झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत सतरा वार्डात ॲड. सुधीर कोठारी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट माजी आमदार राजू तिमांडे यांनीही १७ वार्डातून उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष प्रभावी असून थोडीफार शेतकरी संघटना प्रभावी दिसत आहे. ज्यावेळी नगरपंचायतची स्थापना १३ मार्च २०१५ झाली त्यावेळी निवडणुकीत भाजपाचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात आठ उमेदवार निवडून आणले. शेतकरी संघटनेची मदत घेऊन सत्ता हस्तगत केली. त्यावेळेस काँग्रेसला सभागृहात खाते उघडता आले नाही. राष्ट्रवादीने चार उमेदवार निवडून आणले आजच्या स्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विखुरल्या गेल्याने दोन्ही गटाच्या उमेदवारात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यात प्रहार संघटना व मनसे हे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे कोणता उमेदवार कसा निवडून येते हे महत्त्वाचे राहणार आहे.शरद पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी चंद्रपूर वरून नागपूरला जात असताना जाम चौरस्ता येथे सुधीर कोठारी यांनी ठराविक अंतरावर आपल्या कार्यकर्त्यांसह पवारांचे स्वागत केले त्याच बरोबर काही अंतरावर माजी आमदार राजू तिमांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाम चौरा रस्ता येथे पवारांचे स्वागत केले एकाच पक्षाच्या दोन नेत्यांनी वेगवेगळ्या जागी स्वागत केल्याने पक्षांमधील फूट सर्वांच्या नजरेत आली आहे. नगरपंचायत मधील होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षाचे अधिकृत एबी फार्म कोणत्या गटाच्या नेत्याकडे येते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: NCP divided into two groups In Samudrapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.