सायकल रिक्षातून नवरदेवांची वरात...
By Admin | Updated: May 8, 2017 00:34 IST2017-05-08T00:34:52+5:302017-05-08T00:34:52+5:30
वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन साऊंड सिस्टीम आणि कॅटरर्स आसोसिएशनच्यावतीने रविवारी शहरातील ....

सायकल रिक्षातून नवरदेवांची वरात...
सायकल रिक्षातून नवरदेवांची वरात... वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन साऊंड सिस्टीम आणि कॅटरर्स आसोसिएशनच्यावतीने रविवारी शहरातील जुना आरटीओ चौक मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ३१ जोडपी विवाहबद्ध झाली. यातील नवरदेवांची वरात सायंकाळी शहरातून सायकल रिक्षाने काढण्यात आली. ही वरात वर्धेकरांकरिता आकर्षण ठरली; मात्र ही वरात पाहून अनेकांना वर्धेतील ‘त्या’ कफल्लक श्यामची आठवण देवून गेली. वर्धा शहरात सामूहिक विवाहाची ओळख करून देणाऱ्या श्याम गायकवाड यांच्यानंतर एवढा मोठा सामूहिक विवाह सोहळा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा विवाह मंडपात होती.